डीजे चालक व मालकांवर सातारा पोलिसांचा दणका; नियमभंग प्रकरणी ७ गुन्हे दाखल

सातारा : सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालक आणि साऊंड सिस्टीम मालका विरोधात मोठी कारवाई केली आहे. सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांनुसारही पुढील कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सक्षम प्राधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन करून डीजे व साऊंड सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी संबंधित चालक व मालकांवर कारवाई करण्यात आली.

पुढे शाहूपुरी पोलीस ठाण्यात चार, तर सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे :

  • गुन्हा क्र. २२१/२६आरोपी रोहित बाचलरोहन गोरे (साऊंड मालक) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
  • गुन्हा क्र. २२२/२६आरोपी आरिफ मुलाणी (साऊंड मालक) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
  • गुन्हा क्र. २२३/२६आरोपी सूरज दिनकर पवार (साऊंड मालक) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
  • गुन्हा क्र. २२४/२६आरोपी अभिषेक रवींद्र चव्हाण (साऊंड मालक) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे :

  • गुन्हा क्र. ६१३/२६आरोपी विवेक सुनील भोसले (साऊंड मालक) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमे २२३२८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
  • गुन्हा क्र. ६१३/२६आरोपी प्रतीक सुनील माने (साऊंड मालक) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमे २२३२८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
  • गुन्हा क्र. ६१३/२६आरोपी सूरज सुधीर सपकाळ (साऊंड मालक) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमे २२३२८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

सातारा पोलिसांनी नागरिकांना ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य टाळावे, तसेच प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणारा सराईत अटकेत; ७ गुन्हे उघडकीस

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software