रहिमतपूर पोलिसांची मोठी कामगिरी; ८ लाख ७५ हजारांचे ३२ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत

रहिमतपूर पोलिसांनी CEIR पोर्टलच्या मदतीने ८ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ३२ हरवलेले मोबाईल फोन शोधून नागरिकांना परत केले.

सातारा: रहिमतपूर पोलिसांनी तंत्रज्ञानाची जोड आणि चिकाटीच्या तपासाच्या  बळावर नागरिकांचे हरवलेले तब्बल ३२ मोबाईल फोन शोधून त्यांचे मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ८ लाख ७५ हजार रुपये असून, पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

मोबाईल हरवल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने रहिमतपूर पोलिसांनी गुन्हे प्रकटी करण पथकाच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेतली. सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांत हस्तांतरित झालेले मोबाईल शोधण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आणि आवश्यक पडताळणीनंतर मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी रहिमतपूर पोलीस ठाणे आणि सातारा जिल्हा पोलिसांचे आभार मानले. तसेच, मोबाईल हरवल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण वर्धी तसेच पोलीस कर्मचारी नुपूर कारके, अमर चव्हाण आणि अमर भोसले यांनी सहभाग घेतला.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणारा सराईत अटकेत; ७ गुन्हे उघडकीस

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software