भारतीय रेल्वेत ४०२९ पदांची मेगाभरती; सरकारी नोकरीची मोठी संधी

भारतीय रेल्वेत ४,०२९ ज्युनियर इंजिनिअरसह विविध पदांची भरती जाहीर. आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा ऑनलाईन अर्ज.

नवी दिल्ली: सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेच्या वतीने देशभरातील विविध विभागांमधील रिक्त जागा भरण्यासाठी तब्बल ४०२९ पदांच्या भव्य मेगा भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) ही भरती प्रक्रिया राबविली जात असून, यामध्ये ज्युनियर इंजिनिअर (Junior Engineer), डेपो मटेरियल सुपरिंटेंडेंट (Depot Material Superintendent) आणि केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट (Chemical & Metallurgical Assistant) या अत्यंत महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, १३ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

      या भरती मोहिमे अंतर्गत रिक्त असणारी पदे आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रते बाबत बोलायचे झाल्यास, ज्युनियर इंजिनिअर पदासाठी उमेदवाराकडे मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्स, सिव्हिल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा विविध अभियांत्रिकी शाखांमधील डिप्लोमा (Engineering Diploma) असणे आवश्यक आहे. तसेच, डेपो मटेरियल सुपरिंटेंडेंट पदासाठी कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, केमिकल ॲण्ड मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषयात किमान ४५% गुणांसह पदवी (B.Sc) उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. उमेदवारांची वयोमर्यादा १ जानेवारी २०२७ रोजी १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

     निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन स्तर ६ नुसार आकर्षक वेतन मिळणार आहे. यानुसार उमेदवारांना दरमहा रु. ३५,४०० इतका मूळ प्रारंभिक पगार मिळणार असून त्यासोबतच रेल्वे नियमांनुसार इतर सर्व भत्ते व सवलती लागू असणार आहेत. या भरतीसाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये इतके असून, एससी, एसटी, आजीमाजी सैनिक, ट्रान्सजेंडर, ईबीसी आणि महिला उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

     उमेदवारांची निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विविध टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सर्वप्रथम संगणक-आधारित परीक्षा (CBT-1) घेतली जाईल, त्यानंतर यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना CBT-2 परीक्षा द्यावी लागेल. या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवल्यानंतर कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) पार पडेल. सर्व निकष यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या अंतिम उमेदवारांची रेल्वेमध्ये शासकीय पदावर नियुक्ती केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदती पूर्वी रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software