माणमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; एकाच वेळी ६ ठिकाणी छापे

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दहिवडी पोलिसांची बेकायदेशीर दारूविक्रीवर धडक कारवाई. ६ ठिकाणी छापे टाकून ११,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांवर गुन्हे दाखल.

दहिवडी: माण तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्रास सुरू असलेल्या बेकायदेशीर देशी आणि हातभट्टीच्या दारू विक्रीवर दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी धडक कारवाई केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाच वेळी तब्बल ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली, ज्यामध्ये ११ हजार ८८० रुपये किमतीची बेकायदेशीर देशी व हातभट्टीची दारू आणि माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, याप्रकरणी एकूण ६ जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

      पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, माण तालुक्यातील मलवडी, राणंद, दहिवडी, शिंगणापूर, गोंदवले बुद्रुक आणि महिमानगड या गावांच्या हद्दीमध्ये काही इसमांकडून बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने विशेष पथके तयार केली आणि संबंधित सर्व गावांच्या ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. या अचानक केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी नियमबाह्यरीत्या दारू विक्री करणाऱ्या एकूण सहा संशयितांवर कायदेशीर बडगा उगारला आहे.

कारवाईतील संशयितांची नावे

      ऋषीकेश विजय साळुंखेमलवडी

    बबन विष्णू चव्हाणशिंगणापूर

 तुकाराम मदनेगोंदवले बुद्रुक

 सुनील किसन जाधवदहिवडी

 अर्जुन चंद्रकांत जाधवराणंद

 मारुती रामचंद्र सुतारमहिमानगड

    जप्त मुद्देमाल :११ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल.

     सदरची ही यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक फौजदार प्रकाश हांगे, मोहन हांगे, नंदकुमार खाडे, चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार रवींद्र खाडे, काळेल, राम गाडवे, तनुजा खाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर, गणेश खाडे, संतोष विरकर, अजिनाथ नरबट, निलेश कुदळे व महिला पोलीस दुबळे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. तालुक्यातील अवैध धंदे आणि बेकायदेशीर कारवायांवर आळा घालण्यासाठी यापुढेही अशीच अत्यंत कडक आणि सातत्य पूर्ण कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software