सरकारी नोकरीची मोठी संधी; दिल्ली पोलीस, सीएपीएफमध्ये १,८७१ पदांची भरती

कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) दिल्ली पोलीस व CAPF मध्ये १,८७१ उपनिरीक्षक पदांसाठी भरती जाहीर. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत करा ऑनलाईन अर्ज.

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये उपनिरीक्षक पदाच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेतून एकूण १ हजार ८७१ पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

कोणत्या विभागात किती जागा?

या भरतीमध्ये सीमा सुरक्षा दलातील (BSF) उपनिरीक्षक पदाच्या ४५७ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) २५० जागा, केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) २५४ जागा, भारत-तिबेट सीमा पोलिसातील (ITBP) १८७ जागा आणि सशस्त्र सीमा दलातील (SSB) १७२ जागा आहेत.

याशिवाय दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) पदाच्या २१७ जागा आणि सीआयएसएफमधील उपनिरीक्षक (अग्निशमन) पदाच्या पुरुष प्रवर्गातील २३४ जागा भरण्यात येणार आहेत.

अर्ज कधीपर्यंत करता येणार?

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १० सप्टेंबर २०२६पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. अर्ज शुल्क भरण्यासाठीही आयोगाने स्वतंत्र अंतिम मुदत निश्चित केली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. पदवीची अंतिम परीक्षा दिलेली असून निकालाची प्रतीक्षा करणारे उमेदवारही आयोगाच्या नियमांनुसार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा किती?

उमेदवारांचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार पात्र प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

किती मिळणार पगार?

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगा नुसार वेतनस्तर-६ लागू होणार असून, ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये वेतनश्रेणी असेल. याशिवाय नियमा नुसार इतर भत्ते आणि सुविधा मिळणार आहेत.

ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती काळजीपूर्वक भरावी.

अर्ज सादर करण्यापूर्वी भरलेली सर्व माहिती तपासून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, छायाचित्र आणि स्वाक्षरी आयोगाने दिलेल्या निकषांनुसार अपलोड करावी. अंतिम तारखेच्या दिवशी संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी किंवा मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी वेळेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १० सप्टेंबर २०२६ पासून 

महत्त्वाची तारीख :  ३० सप्टेंबर २०२६ — ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप

Latest News

मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप
केंद्र सरकारच्या दबावाखाली 'मेटा' कडून इन्स्टाग्राम खाती व पोस्ट ब्लॉक केल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप. सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावरून वाद पेटला.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार की महाराष्ट्रातच? अमृता फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
आमदारांच्या वक्तव्यावरून बुलढाण्यात राजकीय संघर्ष; श्वेता महालेंचे कायदेशीर कारवाईचे संकेत
जरांगेंच्या आंदोलना विरोधात सदावर्ते आक्रमक; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात जाण्याची घोषणा
ढोल-ताशांच्या गजरात पुणे फेस्टिव्हलचा शुभारंभ; अलका चौकात रंगणार ‘मंगलाचरण’

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software