ढोल-ताशांच्या गजरात पुणे फेस्टिव्हलचा शुभारंभ; अलका चौकात रंगणार ‘मंगलाचरण’

पुणे फेस्टिव्हल २०२६ चा अलका चौकात 'मंगलाचरण' सोहळ्याने दिमाखदार शुभारंभ. ढोल-ताशांच्या गजरात व भव्य रांगोळीने सांस्कृतिक पर्वाला सुरुवात.

पुणे: विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असणाऱ्या आणि पुणेकरांच्या लाडक्या ‘पुणे फेस्टिव्हल २०२६’च्यावतीने शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता शहरातील मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या अलका चौकात एका आगळ्या वेगळ्या ‘मंगलाचरण सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ‘शिवमुद्रा ढोल पथका’चे जोशपूर्ण स्थिर वादन होणार असून, पुणे फेस्टिव्हलचे अधिकृत बोधचिन्ह असलेली एक भव्य आणि आकर्षक रांगोळी या चौकात रेखाटण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

      कोणत्याही शुभ कार्याची किंवा उत्सवाची सुरुवात करताना ईश्वराकडे कल्याण आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते, ज्याला भारतीय संस्कृतीत ‘मंगलाचरण’ म्हटले जाते. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या सांस्कृतिक उत्साहाला अधिक उधाण आणण्यासाठी या पारंपारिक संकल्पनेची जोड देत या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुणे फेस्टिव्हलचे जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई यांच्यासह खासदार मेधा कुलकर्णी, महसूल राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांसारखे उच्चपदस्थ अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

          या दिमाखदार सोहळ्यासाठी पुण्यातील मानाचे पाच गणपती मंडळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणेशोत्सव मंडळ आणि अखिल मंडई गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणारे कलाकार, पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे पुणेकर गणेशभक्त या सोहळ्याची शान वाढवणार आहेत. गणेशोत्सवाच्या आनंदाला एका अनोख्या सांस्कृतिक उंचीवर नेणारा हा मंगलाचरण सोहळा पुणेकरांसाठी एक पर्वणी ठरणार असून, याद्वारे पुणे फेस्टिव्हलच्या दिमाखदार पर्वाला अधिकृत सुरुवात होत आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप

Latest News

मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप
केंद्र सरकारच्या दबावाखाली 'मेटा' कडून इन्स्टाग्राम खाती व पोस्ट ब्लॉक केल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप. सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावरून वाद पेटला.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार की महाराष्ट्रातच? अमृता फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
आमदारांच्या वक्तव्यावरून बुलढाण्यात राजकीय संघर्ष; श्वेता महालेंचे कायदेशीर कारवाईचे संकेत
जरांगेंच्या आंदोलना विरोधात सदावर्ते आक्रमक; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात जाण्याची घोषणा
ढोल-ताशांच्या गजरात पुणे फेस्टिव्हलचा शुभारंभ; अलका चौकात रंगणार ‘मंगलाचरण’

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software