पुण्यात ‘एमडी’ तस्करांवर कारवाई; कोंढव्यात तिघांना अटक, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील कोंढव्यात अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. ५८ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्जसह ३ तस्करांना अटक, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त.

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तिघांना जेरबंद केले आहे. त्यांच्या कडून तब्बल ५८ ग्रॅमहून अधिक वजनाचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या या अंमली पदार्थाची किंमत सुमारे २ लाख ५९ हजार १८० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

       पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, तासीन आलम शेख (वय १९), आयान समीर शेख (वय २१) आणि आरिफ मुस्तफा शेख (वय २४, सर्व रा. शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. कोंढवा भागातील शिवनेरीनगर परिसरातील पवार चाळ येथील लेन क्रमांक २३ मध्ये काही संशयित तरुण बेकायदेशीरपणे मेफेड्रोन विक्री करण्यासाठी थांबल्याची अत्यंत गोपनीय माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकून सापळा रचला.

       पोलिसांचे पथक आपल्या जवळ येत असल्याचे लक्षात येताच या तिन्ही आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी तातडीने पाठलाग करून तिघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ५८.१४ ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. पोलिसांनी हे अमली पदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ८९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे तस्कर कोंढवा आणि परिसरातील तरुण वर्गाला नेमके कोठे ड्रग्स पुरवत होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे सहभाग आहे, याबाबतचा सखोल तपास पोलिसा कडून केला जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप

Latest News

मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप मेटाकडून आमची सोशल मीडिया खाती लक्ष्य, कॉकरोच जनता पार्टीचा केंद्रावर गंभीर आरोप
केंद्र सरकारच्या दबावाखाली 'मेटा' कडून इन्स्टाग्राम खाती व पोस्ट ब्लॉक केल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप. सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावरून वाद पेटला.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार की महाराष्ट्रातच? अमृता फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
आमदारांच्या वक्तव्यावरून बुलढाण्यात राजकीय संघर्ष; श्वेता महालेंचे कायदेशीर कारवाईचे संकेत
जरांगेंच्या आंदोलना विरोधात सदावर्ते आक्रमक; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात जाण्याची घोषणा
ढोल-ताशांच्या गजरात पुणे फेस्टिव्हलचा शुभारंभ; अलका चौकात रंगणार ‘मंगलाचरण’

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software