पुण्यात घरफोड्यांचा छडा; विश्रामबाग पोलिसा कडून १६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

विश्रामबाग पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक करून १६ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले. ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस.

पुणे : बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या करणाऱ्या एका आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या चौकशीत शहरातील तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपी कडून या गुन्ह्यांतील सुमारे १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

         जगदिशसिंग नमनसिंग कलानी (वय ३४, रा. टिळेकरनगर, कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे आणि पोलीस अंमलदार अनिस शेख यांना आरोपी बाबत गोपनीय माहिती मिळाली. घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित टिळेकरनगर, येवलेवाडी परिसरातील घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

        माहितीची खातरजमा केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून जगदिशसिंग कलानी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने विश्रामबाग परिसरासह पुणे शहरातील इतर भागांत घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.

चौकशीत पाच घरफोडीचे गुन्हे उघड

       आरोपीच्या चौकशीतून विश्रामबाग, भारती आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक २२८/२०२६, १७४/२०२५ आणि ३५९/२०२५, भारती पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक ५६७/२०२५ आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक १५५/२०२५ यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपी कडून घरफोडीच्या गुन्ह्यांतील १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच आरोपीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोरी केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ ऋषीकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

          विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे आणि पोलीस निरीक्षक रमेश लाहिगुडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबूब मोकाशी तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशिकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात आणि महिला पोलीस अंमलदार रेश्मा दिवटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार

Latest News

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध
दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा
पुण्यात धक्कादायक घटना; बसमध्ये धमकी देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software