गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध

पुण्यात सराईत अमली पदार्थ विक्रेता शुभम वाघमारेवर PIT-NDPS कायद्यान्वये कारवाई करत नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पुणे : शहरातील अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या विरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी सराईत अमली पदार्थ विक्रेता शुभम बबन वाघमारे याच्यावर PIT-NDPS कायदा, १९८८ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कारवाई नंतर त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अमली पदार्थ तस्करी बाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणात आरोपी राजाबाबू रमेश प्रसाद याच्या कडून गांजा जप्त करण्यात आला होता. तपास पुढे नेताना हा गांजा शुभम वाघमारे याच्या कडून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

      पोलिसांच्या तपासा नुसार, शुभम वाघमारे याच्या विरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो फेब्रुवारी २०२५ मध्ये जामिनावर बाहेर आला. मात्र, त्यानंतरही अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहारात त्याचा सहभाग सुरू असल्याचे तपासात समोर आले.

PIT-NDPS अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई

        शुभम वाघमारे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अमली पदार्थांच्या व्यवहारातील कथित सहभाग लक्षात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ डॉ. सागर कवडे यांच्यामार्फत PIT-NDPS Act, 1988 मधील तरतुदी नुसार हा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला पुणे पोलीस आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर शुभम वाघमारे याला ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

      पुणे शहरातील अमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि तस्करीला आळा घालण्यासाठी परिमंडळ-३ अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात येत असून, त्याच मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

        सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, भुपेश साळुंके, इस्राईल शेख तसेच पोलीस अंमलदार पंकज देशमुख, अरविंद धावडे, प्रफुल चव्हाण, आश्विनी त्रिभुवन, दैवत शेडगे, हर्षल दुसाने, अण्णा केकान, प्रफुल्ल तारु, विकास बांदल, तानाजी सागर, राहुल ओलेकर, विनायक मोहिते, सागर शेडगे, युवराज कांबळे, राहुल नाईक आणि धीरज आवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार

Latest News

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध
दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा
पुण्यात धक्कादायक घटना; बसमध्ये धमकी देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software