दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त

पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनादरम्यान महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली असून २.५९ लाखांचे दागिने जप्त केले आहेत.

पुणे : गणपतीचा देखावा पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २ लाख ५९ हजार १४० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि लोखंडी कटर जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन, असे एकूण पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

         २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारास एक वाजता फिर्यादी आपल्या नातेवाईकांसह दगडूशेठ गणपतीचा देखावा पाहण्यासाठी आले होते. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स्टॉलसमोर मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या गळ्यातील सोन्याचे मणी, वाट्या आणि कारले असा सुमारे ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

        गुन्ह्याचा तपास सुरू असताना पेट्रोलिंग करणारे पोलीस अंमलदार गजानन सोनुने आणि अजिम शेख यांना संशयित आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरती आकाश चव्हाण (वय २२), सुवर्णा रोहित शिंदे (वय ३५) आणि रोहित उर्फ दीपक शिंदे (वय ४०) यांना ताब्यात घेतले. तिघांची चौकशी आणि झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून १८.५१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले. तसेच चोरीसाठी वापरला जाणारा लोखंडी कटरही जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५९ हजार १४० रुपये आहे.

       आरोपींच्या चौकशीतून फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन, असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या टोळीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवप्रकाश मुळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश राठोड करत आहेत.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार

Latest News

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध
दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा
पुण्यात धक्कादायक घटना; बसमध्ये धमकी देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software