पुण्यात एका दिवसात गुन्ह्यांचा धडाका; घरफोडीपासून जबरी चोरीपर्यंत अनेक घटना

पुणे शहरात एकाच दिवशी घरफोडी, जबरी चोरी, तोतया पोलीस आणि बस प्रवासातील चोऱ्यांचे गुन्हे दाखल. पुणे पोलिसांकडून तपासाला वेग.

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २४ मे २०२५ रोजी विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. घरफोडी, जबरी चोरी, तोतया पोलीस बनून नागरिकांची फसवणूक तसेच बसमधून महिलांच्या दागिन्यांची चोरी अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

       वारजे माळवाडी परिसरातील स्वप्ननगरी कॉम्प्लेक्स, मानगुळकर नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वानवडी परिसरात पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवून नागरिकांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. एसआरपीएफ ग्रुप क्रमांक ८ समोरील रस्त्यावर एका व्यक्तीने स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. त्यानंतर नागरिकांची अंगझडती घेत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तोतया पोलिसाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

         एकतानगर परिसरात दुकानात शिरलेल्या व्यक्तीने दुकानदारावर लोखंडी रॉडने हल्ला केला. मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील ९ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सहकारनगर परिसरातील सुवर्णयुग सोसायटीजवळ एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अडवून चोरट्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी घेऊन चोरटे पसार झाले. या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणाऱ्या महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लष्कर परिसरात आंबेडकर पुतळा ते पुलगेटदरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरीला गेली. लोणी काळभोर परिसरात बीड बसस्थानक ते कुंजीरवाडीदरम्यान प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधील १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याच परिसरात दुसऱ्या एका घटनेत महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरीला गेली.

        फरसखाना, विश्रामबाग आणि हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांना लक्ष्य करण्यात आले. पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी, बस प्रवासात आणि रस्त्यावरून चालताना नागरिकांनी मौल्यवान वस्तू व दागिन्यांची काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसा कडून करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार

Latest News

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध
दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा
पुण्यात धक्कादायक घटना; बसमध्ये धमकी देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software