पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा

पुण्यात आरोपींना बेकायदेशीर मारहाण व धिंड काढल्याप्रकरणी सीआयडीने तात्कालीन वपोनि मानसिंग पाटील यांच्यासह १३ पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी आणि खाकी वर्दीला काळीमा फागणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तसेच अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर पणे डांबून ठेवून त्यांना पट्ट्या व लाठ्यांनी अमानुष मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी त्यांची धिंड काढणे आणि नागरिका समोर गुडघ्यावर बसवून माफी मागण्यास भाग पाडणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या कठोर निर्देश आणि फॅक्ट फाईडिंग रिपोर्टच्या आधारे सीआयडीने केलेल्या कारवाई नुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तब्बल १३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोन वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

         या प्रकरणा मध्ये कायदेशीर कारवाईच्या फेऱ्यात अडकलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक आण्णा मधुकर दराडे, निलेश राजेंद्र मोकाशी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, स्नेहल थोरात, पोलीस हवालदार सुनील दादा हनवते, सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, राहुल अशोक औंधकर, मितेश दत्तात्रय चोरमोले, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, तसेच पोलीस उपनिरीक्षक फकीर, सुतार व पवार आदींचा समावेश आहे. राज्य मानवी हक्क आयोगाच्या निर्देशा नंतर सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक संकेत सतिश गोसावी यांनी याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

         मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, पहिली घटना ५ ते ९ जुलै दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसआरए कॉलनीच्या पार्किंग एरिया मध्ये घडली होती. खुनाच्या गुन्ह्यात शरण आलेले आरोपी पोलीस ठाण्यात आल्यानंतर मानसिंग पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना पट्ट्याने हातावर व पायावर बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना एसआरए कॉलनीत नेऊन या घटनेचे व्हिडिओ चित्रण करण्यात आले. या चित्रिकरणात आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवून चालण्यास भाग पाडले गेले आणि काठ्या-लाठ्यांनी मारहाण करून सार्वजनिकरीत्या अपमानित करत हात जोडून माफी मागण्यास मजबूर केले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराची कोणतीही अधिकृत जनरल डायरी किंवा पोलीस वाहनांच्या लॉग बुकमध्ये नोंद करण्यात आली नाही, तसेच वैद्यकीय तपासणीतही दुखापती लपवण्यात आल्या. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांखाली पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        तर दुसरी अत्यंत लाजीरवाणी घटना २० व २१ जुलै रोजी आंबेगाव पठार पोलीस चौकीमध्ये घडली होती. यादरम्यान चार अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आणि बाळ कल्याण पोलीस अधिकारी नसतानाही सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, २१ जुलै रोजी या अल्पवयीन मुलांना आणि इतर आरोपींना आंबेगाव पठार चौकी ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यापर्यंत पोलीस वाहनाच्या बोनेटला दोरखंडाने बांधून त्यांची सार्वजनिक रस्त्यावरून अत्यंत अवमानकारक धिंड (परेड) काढण्यात आली. या धिंडी दरम्यान आरोपींना बांबू व बॅटनने मारहाण करण्यात आली आणि लाऊडस्पीकरवरून ते हत्येप्रकरणातील गुन्हेगार असल्याची घोषणा करत त्यांची ओळख उघड करण्यात आली. या मुलांवर अत्याचार करताना आरोपी अनुसूचित जातीचे असल्याची पूर्ण जाणीव असूनही हा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला.

        याशिवाय, ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरा समोर किंवा दंडाधिकाऱ्या समोर मारहाणी बाबत काहीही बोलू नये म्हणून मुलांना धमकावण्यात आले आणि बाल न्यायमंडळाची दिशाभूल करण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार करण्यात आले. या दुसऱ्या प्रकरणात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, भारतीय न्यायसंहिता आणि अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (Atrocities Act) यांसारखे अत्यंत कठोर कायदे लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसा कडूनच कायद्याचा असा सरास गैरवापर आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन झाल्यामुळे पुणे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार

Latest News

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध
दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा
पुण्यात धक्कादायक घटना; बसमध्ये धमकी देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software