पुणे विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना ‘वाय-फाय’ नाही; निष्क्रिय आयटी सेलवर कारवाईची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) कोट्यवधींचा खर्च होऊनही इंटरनेट सेवा ठप्प. आयटी सेलच्या चौकशीची मागणी व ४८ तासांत वाय-फाय पूर्ववत करण्याचा अल्टीमेटम.

पुणे: देशाच्या आणि राज्याच्या शैक्षणिक मानगुटीवर मानाचे स्थान असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) मुख्य परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘वाय-फाय’ (Wi-Fi) आणि इंटरनेट सुविधा पूर्णपणे कोलमडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विद्यापीठाच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर आणि इंटरनेट यंत्रणेवर प्रशासना कडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मूलभूत इंटरनेट सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या (A) वतीने कुलगुरूंना अधिकृत निवेदन देण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आर्थिक व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

         विद्यापीठाच्या ग्रंथालय परिसर आणि होस्टेल परिसरात संशोधनासाठी वावरणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा मोठा विपरीत परिणाम होत आहे. आजच्या डिजिटल युगात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध (Research Papers) तयार करणे, विविध शासकीय व शैक्षणिक ऑनलाइन अर्ज भरणे, तसेच अन्य तांत्रिक अभ्यासपूर्ण कामांसाठी सतत इंटरनेटची गरज भासते. मात्र, विद्यापीठात वाय-फाय सेवा सुरळीत चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कातून आणि करदात्यांच्या पैशातून डिजिटल विकासासाठी खर्च होत असताना प्रत्यक्षात मात्र ही सुविधा कागदावरच उरली असल्याचा आरोप संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुरज श्रीराम गायकवाड यांनी निवेदनात केला आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून या डिजिटल व्यवस्थेवर नेमका किती खर्च झाला आणि तो निधी कुठे मुरला, याची कसून चौकशी झाली पाहिजे, असा सूर विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

          या संपूर्ण प्रकारासाठी विद्यापीठाच्या ‘आयटी सेल’च्या (IT Cell) कार्यक्षमतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आयटी सेलमधील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना उच्च वेतन आणि विविध सोयी-सुविधा दिल्या जात असताना ऐन महत्त्वाच्या शैक्षणिक सत्रात ही यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या हिवाळी किंवा उन्हाळी परीक्षांच्या काळात आणि नियमित अभ्यासाच्या वेळेत इंटरनेट सेवा ठप्प असणे ही प्रशासकीय अनास्थेची पराकोटी असल्याची टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आयटी सेलच्या एकूणच कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

           विद्यार्थ्यांचे आणखी होणारे मोठे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. विद्यापीठ परिसरातील वाय-फाय व इंटरनेट सुविधा युद्धपातळीवर आणि शक्यतो पुढील ४८ तासांत पूर्ववत सुरू करावी, अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यां मधून घेतली जात आहे. जर सद्यस्थितीत कार्यरत असलेला आयटी सेल ही जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरत असेल, तर त्यांची ही यंत्रणा तात्काळ बंद करून सदर विभागाची संपूर्ण जबाबदारी कॉम्प्युटर सायन्स (Computer Science) विभाग किंवा अन्य किसी अधिक सक्षम तांत्रिक विभागाकडे सुपूर्द करण्यात यावी, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थी परिषदेने दिला आहे.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार

Latest News

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध
दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा
पुण्यात धक्कादायक घटना; बसमध्ये धमकी देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software