​हडपसर महावितरणचा क्लास-१ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; १२ वीज मीटर जोडणीसाठी मागितली होती लाच


पुणे वृत्तसेवा:

शासकीय कामांसाठी सर्वसामान्यांना आणि कंत्राटदारांना वेठीस धरणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आपली धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. महावितरणच्या हडपसर उपविभाग-२ मधील अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वर्ग-१) रामचंद्र नारायण लोंढे (वय ४२) याला आज दुपारी १:०६ वाजता ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले

मीटर मागे हजार रुपयांची लाच!

​लाचखोर रामचंद्र लोंढे (रा. चिंचवड, पुणे) याच्याविरुद्ध एका इलेक्ट्रिकल सब-कॉन्ट्रॅक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने हडपसर परिसरात नवीन १२ वीज मीटर जोडणीचे काम केले होते. या कामाचा मोबदला म्हणून अभियंता लोंढे याने प्रतिमीटर १,००० रुपये प्रमाणे एकूण १२,००० रुपयांची लाच मागितली होती. याशिवाय, एका दुसऱ्या इमारतीच्या वीज कनेक्शनचे काम मंजुर करण्यासाठी त्याने थेट ५०,००० रुपयांची वेगळी मागणी कंत्राटदाराकडे केली होती.कंत्राटदाराने २ जून रोजी पुण्याच्या 'एसीबी' कार्यालयात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. 

Corruption.jpg

​'एसीबी'चा सापळा आणि अटक

​कंत्राटदाराच्या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने २ जून रोजीच हडपसर कार्यालयात जाऊन लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी लोंढे याने १२,००० रुपयांपैकी ४,५०० रुपये आधीच घेतल्याचे कबूल केले आणि उरलेले ७,५०० रुपये घेऊन येण्यास सांगितले. लाचेची मागणी निश्चित झाल्यानंतर, आज (४ जून) दुपारी एसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्या पथकाने हडपसर येथील महावितरण कार्यालयातच सापळा रचला. कंत्राटदाराकडून उर्वरित ७,५०० रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने लोंढे याला रंगेहात बेड्या ठोकल्या.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

​भ्रष्टाचारी अभियंता रामचंद्र लोंढे याला ताब्यात घेण्यात आले असून, पुणे शहरातील फुरसुंगी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (PC Act) गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत. ​ही यशस्वी कामगिरी एसीबीचे पुणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस

Latest News

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस
सातारा: सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे  (डी.बी.) पथकाने धडक कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे....
​हडपसर महावितरणचा क्लास-१ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; १२ वीज मीटर जोडणीसाठी मागितली होती लाच
लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी १ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाई
सातारा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स की 'लूटमारीची' दुकाने? 'पांढऱ्या कपड्यातील देवदूतांच्या' वाढत्या व्यावसायिकतेवर जनतेचा संतप्त सवाल!

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software