लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी १ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाई

पुणे:

शेतजमीन सपाटीकरण, विहीर खोदकाम आणि पाईपलाईनच्या परवानगीसाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लोणी काळभोर येथील अपर तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय शिवाजी कोल्हे (वय २८, रा. शेवाळवाडी, पुणे) याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार (ACB) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील ३८ वर्षीय तक्रारदार यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, त्यांनी मौजे हिंगणगाव (ता. हवेली) येथील शेतजमीन कामांच्या मंजुरीसाठी अपर तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. ही परवानगी वरिष्ठ पातळीवरून करून देण्यासाठी आरोपी कोल्हे याने सुरुवातीला २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने १ एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर, २ एप्रिल रोजी एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान आरोपीने तडजोडीअंती १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २९ मे २०२६ रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक आसावरी शेंडगे करत आहेत. शासकीय कामासाठी कुणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ९४०३७८१०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

शेतकऱ्यांचे पंचनामे करणारा तलाठीच 'आपत्ती'त; पिंगळीत तलाठ्यालाच आसऱ्याची गरज!

Latest News

शेतकऱ्यांचे पंचनामे करणारा तलाठीच 'आपत्ती'त; पिंगळीत तलाठ्यालाच आसऱ्याची गरज! शेतकऱ्यांचे पंचनामे करणारा तलाठीच 'आपत्ती'त; पिंगळीत तलाठ्यालाच आसऱ्याची गरज!
दहिवडी: एकीकडे शासन 'गतिमान प्रशासन' आणि 'डिजिटल इंडिया'च्या मोठ्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे मात्र महसूल प्रशासनाचा...
विमाननगरमध्ये भररस्त्यात हप्ता न दिल्याने चायनीज सेंटरच्या स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
सातारा पोलिसांची धडक कारवाई: ४ चोरीच्या दुचाकींसह सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या; वाढे फाट्यावर थरारक पाठलाग!
कोविड काळात पॅरोलवर सुटला अन् थेट ४ वर्ष गायब झाला; कोल्हापूर जेलमधील 'त्या' अट्टल गुन्हेगाराला सातारा एलसीबीने कसे पकडले?
पुण्यात ऑनलाईन ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software