वाठार पोलिसांचा धडाकेबाज दणका; बिचुकले गावात जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ जणांना अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

वाठार स्टेशन: वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर वाठार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बिचुकले (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील पळसवाट शिवारात काही लोक पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, वाठार पोलिसांच्या डी.बी. पथकाने धाड टाकून ७ संशयितांना रंगेहात पकडले आहे.

​पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करून ते बंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी आपल्या डी.बी. पथकाला विशेष मार्गदर्शन करून कारवाईचे आदेश दिले होते. २७ मे २०२६ रोजी सपोनि सुशील भोसले यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोउनि सातव व डी.बी. पथकाने बिचुकले येथील पळसवाट शिवारात अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी अर्जुन नारायण पवार (वय ५०), मानसिंग साहेबराव पवार (वय ६१), विनोद हणमंत पवार (वय ४५), शिवाजी नथु शिंदे (वय ७०), अरुन धर्माजी सपकाळ (वय ६५), बाळकृष्ण चंदरराव पवार (वय ४७, सर्व रा. बिचुकले) आणि आण्णा शंकर पवार (वय ४६, रा. गुजरवाडी) या ७ इसमांना ताब्यात घेतले.

​या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, ७ मोटार सायकली आणि रोख रकमेसह एकूण ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास पोहवा जितेंद्र शिंदे करत आहेत. पोलीस अंमलदार विठ्ठल काळे यांनी या गुन्ह्याची खबर दिली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले, पोउनि गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, पोहवा उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, प्रतिक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे, महिला पोलीस हवालदार दिपाली गुरव, माधुरी दिक्षीत, आशा देशमुख आणि पूजा जगताप यांच्या पथकाने केली आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

पुणे विमानतळाच्या १५ किमी परिसरात 'लेझर शो' आणि 'प्रखर लाईट्स'वर बंदी; पोलीस सह आयुक्तांचे आदेश

Latest News

पुणे विमानतळाच्या १५ किमी परिसरात 'लेझर शो' आणि 'प्रखर लाईट्स'वर बंदी; पोलीस सह आयुक्तांचे आदेश पुणे विमानतळाच्या १५ किमी परिसरात 'लेझर शो' आणि 'प्रखर लाईट्स'वर बंदी; पोलीस सह आयुक्तांचे आदेश
पुणे: विमान उड्डाणे आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोहगाव येथील भारतीय वायुसेना...
वाठार पोलिसांचा धडाकेबाज दणका; बिचुकले गावात जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ जणांना अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
माण तालुक्यात काळीज हेलावणारी घटना; आईसोबत विहिरीवर गेलेल्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू
वाघोलीत महिलेला जखमी करून मंगळसूत्र लांबवणारा चोरटा जेरबंद; चोरीच्या दुचाकीसह अवघ्या ८ तासांत पोलिसांची धडक कारवाई!
महिंद्रा आणि अ‍ॅको इन्शुरन्सच्या वादात ग्राहक भरडला! EV बॅटरी ट्रान्झिट खर्चावरून 'डेडलॉक'

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software