सातारा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 सातारा (दि. २९):

आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याच्या काही चुकीच्या अफवा सातारा जिल्ह्यात पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पंपांवर गर्दी करून विनाकारण साठेबाजी न करण्याचे कडक आवाहन केले आहे.

129574600.cms

​या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) व हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या प्रमुख ऑईल कंपन्यांचे विक्री अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला असता, साताऱ्यातील इंधन पुरवठ्याची सद्यस्थिती पूर्णपणे समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले.

​सातारा जिल्ह्यात सध्या एकूण ३३८ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. जिल्ह्याला शेजारील हवेली (पुणे), मिरज (सांगली) आणि पाकणी (सोलापूर) या तीन वेगवेगळ्या ऑईल डेपोमधून नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी दररोज ६ लाख लिटर (६०० किलोलीटर) पेट्रोल आणि १० लाख लिटर (१००० किलोलीटर) डिझेलची विक्री होते. या दैनंदिन गरजेच्या तुलनेत आजघडीला सातारा जिल्ह्यात २७ लाख ७६ हजार लिटर (२७७६ किलोलीटर) पेट्रोल आणि ३६ लाख ७१ हजार लिटर (३६७१ किलोलीटर) डिझेलचा मोठा साठा शिल्लक आहे.

​तसेच ऑईल कंपन्यांकडूनही जिल्ह्याच्या मागणीनुसार दररोज पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. इंधन पुरवठा करणारे तिणीही मुख्य डेपो सातारा जिल्ह्याच्या अगदी जवळ असल्याने वाहतुकीत किंवा पुरवठ्यात कोणताही खंड पडणार नाही, असे ऑईल कंपन्यांनी बैठकीत स्पष्ट केले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही चिंतेशिवाय आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

शेतकऱ्यांचे पंचनामे करणारा तलाठीच 'आपत्ती'त; पिंगळीत तलाठ्यालाच आसऱ्याची गरज!

Latest News

शेतकऱ्यांचे पंचनामे करणारा तलाठीच 'आपत्ती'त; पिंगळीत तलाठ्यालाच आसऱ्याची गरज! शेतकऱ्यांचे पंचनामे करणारा तलाठीच 'आपत्ती'त; पिंगळीत तलाठ्यालाच आसऱ्याची गरज!
दहिवडी: एकीकडे शासन 'गतिमान प्रशासन' आणि 'डिजिटल इंडिया'च्या मोठ्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे मात्र महसूल प्रशासनाचा...
विमाननगरमध्ये भररस्त्यात हप्ता न दिल्याने चायनीज सेंटरच्या स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
सातारा पोलिसांची धडक कारवाई: ४ चोरीच्या दुचाकींसह सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या; वाढे फाट्यावर थरारक पाठलाग!
कोविड काळात पॅरोलवर सुटला अन् थेट ४ वर्ष गायब झाला; कोल्हापूर जेलमधील 'त्या' अट्टल गुन्हेगाराला सातारा एलसीबीने कसे पकडले?
पुण्यात ऑनलाईन ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software