महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; ११ वीज मीटर जोडणीसाठी २ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक!


पुणे: नवीन वीज मीटर जोडणीचा सर्व्हे करून देण्यासाठी आणि सर्व ११ प्लॉट्सचे वीज मीटर बसवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या बदल्यात तब्बल २ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. गजानन बाळासाहेब चट्टे (वय ३५, रा. विठ्ठलवाडी, देहू बायपास रोड, मूळ गाव हट्टा, जि. हिंगोली) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या वर्ग-४ च्या लाचखोर वायरमनचे नाव आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  


12 विज मीटर जोडण्यासाठी हडपसर मध्ये मागितली लाच वाच सविस्तर

​याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार हे एक शासकीय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. येलवडी (ता. खेड) येथील संत तुकाराम नगरमधील एका महिला ग्राहकाने आपल्या १ गुंठ्याच्या प्लॉटमध्ये नवीन वीज मीटर बसवण्यासाठी तक्रारदारांना कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्या अनुषंगाने तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज अपलोड झाल्यानंतर जागेचा सर्व्हे करून घेण्यासाठी तक्रारदार हे महावितरणचे येलवडी येथील वायरमन गजानन चट्टे याला भेटले. त्यावेळी चट्टे याने तक्रारदाराला, "त्या प्लॉटिंगमधील सर्वच्या सर्व ११ प्लॉट्सचे वीज मीटर बसवण्याचे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला देतो" असे आमिष दाखवले आणि त्या बदल्यात तब्बल २,००,०००/- रुपयांच्या लाचेची मागणी केली.  

​तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी ५ जून २०२६ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी केली, ज्यामध्ये वायरमन चट्टे याने ११ नवीन वीज मीटर जोडणीसाठी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास भैरवनाथ चौक, देहूगाव येथे सापळा रचला. संध्याकाळी १८:३२ वाजताच्या सुमारास आरोपी वायरमन गजानन चट्टे याने तक्रारदाराकडून लाचेची २ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात दबोचले.  

​सदरची धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजित पाटील आणि श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, सापळा अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती भारती मोरे आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबी पुणे कार्यालयाच्या ०२०-२६१२२१३४ किंवा ९४०३७८१०६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.  

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; खराडी येथून २१ लाखांच्या 'एमडी' ड्रग्जसह राजस्थानचा तस्कर जेरबंद

Latest News

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; खराडी येथून २१ लाखांच्या 'एमडी' ड्रग्जसह राजस्थानचा तस्कर जेरबंद पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; खराडी येथून २१ लाखांच्या 'एमडी' ड्रग्जसह राजस्थानचा तस्कर जेरबंद
​पुणे: पुणे शहरातून अंमली पदार्थांचे समूळ नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी सध्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे पोलीस...
महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; ११ वीज मीटर जोडणीसाठी २ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक!
डिजिटल क्रांती की केवळ इंटरनेटचा बुडबुडा? कॉकरोच जनता पार्टीसमोर तरुणांना रस्त्यावर उतरवण्याचे मोठे आव्हान.
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस
​हडपसर महावितरणचा क्लास-१ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; १२ वीज मीटर जोडणीसाठी मागितली होती लाच

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software