पुणे पोलिसांचा अनोखा आदर्श; डीजेऐवजी आंबेगावच्या विसर्जन मिरवणुकीत बाल वारकऱ्यांचा सहभाग

पुण्याच्या आंबेगाव पोलीस ठाण्याचा अनोखा उपक्रम. विसर्जन मिरवणुकीत डीजेऐवजी आळंदीतील बाल वारकऱ्यांचा सहभाग व पारंपरिक पद्धतीने विसर्जन.

पुणे: गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाजवला जाणारा कर्णकर्कश डीजे (DJ) आणि त्यावर होणारे अवाच्या सवा नाच गाण्यांच्या संस्कृतीवर सध्या सर्वत्र टीकेची झोड उठत असताना, पुणे शहर पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या आंबेगाव पोलीस ठाण्याने एक अत्यंत स्तुत्य, सांस्कृतिक आणि अनुकरणীয় असा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध, पारंपरिक आणि अध्यात्मिक वातावरणात पार पाडावी, या उदात्त हेतूने आंबेगाव पोलिसांनी यंदाच्या गणेशोत्सवात चक्क आळंदी येथील बाल वारकरी पथकाला निमंत्रित केले होते. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि हरिनामाच्या जयघोषात निघालेली ही आगळीवेगळी मिरवणूक पुणेकरांच्या विशेष आकर्षण ठरली असून, या उपक्रमाने संपूर्ण शहरात एक सकारात्मक संदेश दिला आहे.

        सध्याच्या काळात गणेश विसर्जन मिरवणुका म्हणजे फिल्मी गाण्यांवर तरुणाईचा अचाट व थिल्लर नाच असा एक नकोसा पायंडा पडत चालला आहे. या सर्व प्रकारांना पूर्णपणे फाटा देत आपली मिरवणूक पारंपारिक वारकरी संप्रदायाच्या व सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे साजरी करण्याचा दृढ मानस आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी व्यक्त केला होता. याच संकल्पनेतून पोलिसांनी विशेष पुढाकार घेऊन आळंदी येथून बाल वारकऱ्यांच्या पथकाला या मिरवणुकीत सहभागी करून घेतले. मिरवणुकीच्या अगदी अग्रभागी हातामध्ये टाळ-मृदंग घेऊन हरिनामाचा अखंड गजर करणारे हे बाल वारकरी उपस्थितांचे डोळे आणि मन जिंकून घेत होते. त्यांच्या सोबतच पारंपरिक ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह भरला होता. विशेष म्हणजे, बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यासाठी एका खास आणि पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या सुंदर बैलगाडीचा वापर करण्यात आला होता, ज्याने उपस्थितांच्या जुन्या संस्कृतीच्या आठवणी ताज्या केल्या.

        ही वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक आंबेगाव पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन शनीनगर चौक, टेल्को कॉलनी चौक, आणि तिथून जांभुळवाडी रोड मार्गे जांभुळवाडी तलावापर्यंत काढण्यात आली. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत केले. या ऐतिहासिक व सांस्कृतिक मिरवणुकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्यासह पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, फिरोज मुलानी, महेश नाईकवाडी, स्वाती देवधर, अश्विनी पाटील, प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नीतीराज थोरात, लक्ष्मण डोईफोडे, सुनीता काकुर्ले यांसह अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, या उपक्रमात महिला दक्षता समितीचे सदस्य, मोहल्ला व अल्पसंख्याक समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील हजारो नागरिक मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. पोलिसांच्या या लोकोपयोगी आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, आगामी काळात इतर सार्वजनिक गणेश मंडळांनीही यातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हायकोर्टाचा दणका; रस्त्यांवर फटाके बंद, डीजे-लेझरवरही कडक निर्बंध

#Draft: Add Your Title

#Draft: Add Your Title

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software