गणेशोत्सवात सातारा तालुका पोलिसांचा दणका; २७ जण हद्दपार, १६८ जणांवर कारवाई

गणेशोत्सवात सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; २७ गुन्हेगार हद्दपार, तर १६८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.

सातारा : गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती विरोधात धडक कारवाई केली आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि उत्सव काळात शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या २७ जणांवर हद्दपारीची कारवाई, तर १६८ संशयित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

       सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, खंडणी तसेच शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून ही कारवाई करण्यात आली. संबंधित व्यक्तींमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (सातारा शहर विभाग) तसेच प्रांताधिकारी, सातारा यांच्या सूचनेनुसार आणि आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

२७ जणांवर हद्दपारीची कारवाई

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २७ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

१६८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

याशिवाय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये संशयित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण १६८ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, हा या कारवाईमागील उद्देश आहे.

      हद्दपार किंवा प्रतिबंधात्मक कारवाई झालेल्या व्यक्तींनी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करू नये. अशा व्यक्तींनी आदेशाचे उल्लंघन करून परिसरात प्रवेश केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, परिसरात कोणताही अनुचित प्रकार, संशयास्पद हालचाल किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारी घटना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा तालुका पोलिसांनी केले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हायकोर्टाचा दणका; रस्त्यांवर फटाके बंद, डीजे-लेझरवरही कडक निर्बंध

#Draft: Add Your Title

#Draft: Add Your Title

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software