राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार. हवामान खात्याकडून मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा व ७ जिल्ह्यांना पिवळा इशारा (Yellow Alert).

पुणे: मागील काही दिवसा पासून राज्यात वाढलेल्या उष्णतेमुळे आणि दमट वातावरणामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटामुळे मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हालांकि, राज्यभरात सर्वदूर पावसाची समान हजेरी लागलेली नसली, तरी अनेक भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या परतीच्या आणि स्थानिक वातावरणातील बदलामुळे तापमानात घट होऊन उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

         हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजा नुसार, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, सांगली, पुणे व पुणे घाटमाथा, नाशिक व नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटा सह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः सातारा, सातारा घाटमाथा, रायगड, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. याशिवाय, पालघर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. पावसाच्या या कालावधीत कोकण आणि गोव्यात २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात २२ व २३ सप्टेंबर आणि मराठवाड्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यम ते व्यापक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान, तर मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी जोरदार मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

        हवामान विभागाने केवळ पावसाचाच नव्हे, तर वाऱ्यांचाही तीव्र वेग राहण्याचा इशारा दिला आहे. राज्याच्या काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अचानक सुटणारे वारे आणि विजांच्या कडकडाटाच्या काळात नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे. विशेषतः विजा चमकत असताना नागरिकांनी उघड्यावर किंवा झाडाखाली थांबणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. शेतीच्या दृष्टीनेही या पावसामुळे काही भागांत दिलासा मिळाला असला, तरी संभाव्य अतिवृष्टी किंवा वाऱ्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हायकोर्टाचा दणका; रस्त्यांवर फटाके बंद, डीजे-लेझरवरही कडक निर्बंध

#Draft: Add Your Title

#Draft: Add Your Title

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software