लाचखोर पोलीस उपनिरीक्षक १ लाखाची लाच घेताना रंगेहात अटक; विमानतळ पोलीस ठाण्यातील कारवाई

नांदेड: नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास (PSI) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील २५ वर्षीय महिला तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांना मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

एसीबीचा सापळा आणि अटक
तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ संभाजी तांबोळी (वय ४३) यांनी या लाच मागणीसाठी प्रोत्साहन (अपप्रेरणा) दिल्याचे समोर आले.२३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० ते २०:१२ च्या दरम्यान, नांदेड येथील नमस्कार चौक, ब्रम्हसिंग नगर भागात सापळा रचण्यात आला. 'किंग कोब्रा बिअर बार'च्या पाठीमागे असलेल्या तक्रारदाराच्या वडिलांच्या घरी, १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पीएसआय गोविंद जाधव यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. गोविंद बालाजीराव जाधव (पोलीस उपनिरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन) याला अटक करण्यात आले असून वैजनाथ संभाजी तांबोळी (पोलीस कॉन्स्टेबल) सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करीमखान पठाण व त्यांच्या पथकाने केली.कोणत्याही शासकीय कामासाठी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर किंवा कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड

Latest News

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड
दहिवडी: पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर...
माण तालुक्यातील घोडेवाडी येथे जुन्या वादातून सात जणांकडून एकाला बेदम मारहाण दोन दात पाडले; दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल  ​
कुख्यात गुंड गजा मारणेला मतदानासाठी दोन दिवस शहरात येण्याची उच्च न्यायालयाची परवानगी
दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई ; पुणे जिल्ह्यातील सराईत टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
संस्कारांची शिदोरी आणि व्यसनमुक्तीचा जागर! नरवणे बालसंस्कार केंद्राचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software