- Hindi News
- सातारा
- श्री. महालक्ष्मी विद्यालय, आंधळी येथे बालिका दिन व सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी
श्री. महालक्ष्मी विद्यालय, आंधळी येथे बालिका दिन व सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी
दहिवडी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत श्री. महालक्ष्मी विद्यालय, आंधळी येथे बालिका दिन व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त व उत्कृष्ट सहभाग नोंदवून माता सावित्रीमाई फुले यांच्या जीवनचरित्र व स्त्री शिक्षणासाठी केलेल्या अमूल्य कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचे संघर्षमय जीवन, सामाजिक सुधारणांतील योगदान व आजच्या काळातील त्यांची प्रेरणा यावर सखोल प्रकाश टाकत आपले विचार मांडले. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थित मान्यवर व पालक वर्ग भारावून गेला.
या कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, लोकनियुक्त आदर्श सरपंच दादासाहेब काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय जगन्नाथ काळे यांच्यासह तानाजी काळे, जयप्रकाश वलेकर, बापूराव काळे, चंद्रशेखर काळे, राहुल काळे, नाथा चव्हाण, ॲड. किशोर खरात, देविदास माने, विजय वाघमोडे, प्रियांका खरात आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत बालक-बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना ग्रामपंचायत आंधळी नेहमीच प्रोत्साहन देत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला असून बालिका सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
