- Hindi News
- सातारा
- इतिहासात पहिल्यांदाच म्हसवड निवडणूक ठरली रक्तरंजित संघर्षाविना; API अक्षय सोनवणेंचे सर्वत्र कौतुक
इतिहासात पहिल्यांदाच म्हसवड निवडणूक ठरली रक्तरंजित संघर्षाविना; API अक्षय सोनवणेंचे सर्वत्र कौतुक
दहिवडी: म्हसवड नगरपालिकेची निवडणूक म्हटली की डोळ्यांसमोर उभे राहायचे ते कार्यकर्त्यांमधील वाद, तुंबळ हाणामारी आणि त्यानंतर दाखल होणारे पोलिसांमधील गुन्हे. मात्र, यावेळच्या निवडणुकीने एक नवा इतिहास रचला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अक्षय सोनवणे यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि कडक अंमलबजावणीमुळे म्हसवडची निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडली आहे.
राजकीय संघर्षाला खाकीचा लगाम
म्हसवड नगर परिषदेत नामदार जयकुमार गोरे आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. या संघर्षाचे रूपांतर अनेकदा वादात होते. मात्र, अक्षय सोनवणे यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम केले. त्यांनी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सज्जड दम दिला. स्थानिक राजकारणात कोणाच्याही सांगण्यावरून हस्तक्षेप न करता, त्यांनी 'खाकी'ची ताकद आणि निष्पक्षता दाखवून दिली.
३२ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
निवडणूक काळात शांतता भंग होऊ नये यासाठी सोनवणे यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतले. रेकॉर्डवरील तब्बल ३२ भुरट्या गुन्हेगारांना निवडणूक काळात तडीपार करून त्यांनी गुन्हेगारी जगताचे कंबरडे मोडले. या आक्रमक पवित्र्यामुळेच निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सातारा जिल्ह्यातील 'सर्वोत्कृष्ट पोलीस अधिकारी'
अक्षय सोनवणे यांच्या कामाची दखल केवळ म्हसवडमध्येच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात घेतली जात आहे. सातारा जिल्ह्यातील ३२ पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा विचार करता, सोनवणे यांनी आपल्या कार्यकुशलतेने 'सर्वोत्कृष्ट पोलीस अधिकारी' असा मान मिळवला आहे. सर्वांना समान वागणूक आणि कायद्याचे राज्य ही त्यांची कार्यपद्धती सध्या सातारा जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
"आजपर्यंतच्या इतिहासात म्हसवडची निवडणूक इतकी शांत कधीच झाली नव्हती. हे केवळ अक्षय सोनवणे यांच्या निस्पृह आणि कणखर धोरणामुळे शक्य झाले आहे," अशी भावना आता स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
निपक्षपाती पोलीस अधिकारी
सपोनि. अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केले नाही. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो कायद्यापुढे कोणालाही त्यांनी क्षमा केलेली नाही. अनेकदा त्यांच्यावरती राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न झाला होता मात्र त्या दबावाला कधीही बळी पडले नाहीत. स्थानिक राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून कधीही कोणाला नाहक त्रास दिला नाही. त्यामुळे सपोनि. अक्षय सोनवणे हे आदर्श पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती आहे.
