- Hindi News
- सातारा
- माणच्या लेकाचं नशीब चमकलं! इंडियन ऑईलच्या लकी ड्रॉमध्ये जिंकली आलिशान 'स्विफ्ट डिझायर' कार
माणच्या लेकाचं नशीब चमकलं! इंडियन ऑईलच्या लकी ड्रॉमध्ये जिंकली आलिशान 'स्विफ्ट डिझायर' कार
दहिवडी: इंडियन ऑईल कंपनीतर्फे जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या कालावधीत संपूर्ण भारतात राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी गावचे रहिवासी शेखर पाटील यांनी बाजी मारली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी 'प्रथम बक्षीस' म्हणून स्विफ्ट डिझायर कार जिंकली आहे. शेखर पाटील हे दहिवडी येथील 'मे. जगदाळे पेट्रोलियम' या पंपाचे नियमित ग्राहक आहेत. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल आणि बक्षीस वितरणासाठी दहिवडी येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता 'जगदाळे पेट्रोलियम, दहिवडी-सातारा रोड' येथे हा सोहळा संपन्न झाला.
या शुभप्रसंगी भाग्यवान विजेत्याला कारची चावी सुपूर्द करण्यात आली.या कार्यक्रमाला इंडियन ऑईलचे अनेक वरिष्ठ अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यामध्ये गुरु प्रसाद (कार्यकारी निदेशक व राज्यप्रमुख, इंडियन ऑईल, मुंबई), ए. राजाराम (मंडळ रिटेल प्रमुख, इंडियन ऑईल, पुणे), विभाष कुमार सिन्हा (मुख्य प्रबंधक रिटेल सेल्स, इंडियन ऑईल, पुणे), मनिष पाटीदार (रिटेल सेल्स ऑफिसर, इंडियन ऑईल, सातारा - पूर्व), सिद्धार्थ शुक्ला (रिटेल सेल्स ऑफिसर, इंडियन ऑईल, सातारा - पश्चिम), जगदाळे पेट्रोलियमचे मालक मिलिंद जगदाळे, विजय जाधव आदी. मान्यवर उपस्थित होते
यावेळी मे. जगदाळे पेट्रोलियमच्या वतीने विजेत्याचे अभिनंदन करण्यात आले. एका ग्रामीण भागातील ग्राहकाला राष्ट्रीय स्तरावरील कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये एवढे मोठे बक्षीस मिळाल्याने दहिवडी आणि जाशी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
