म्हाडाची नवी योजना; विक्री न झालेली शेकडो घरे आता भाड्याने देणार

म्हाडाच्या सोडतीत न विकलेली घरे आता भाडेतत्त्वावर मिळणार. दिवाळीपूर्वी सुरू होणाऱ्या ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करण्यासह सर्व प्रक्रिया डिजिटल होणार.

मुंबई: स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईत हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न महागाई आणि वाढत्या किमतींमुळे अपूर्णच राहते. अशा सर्व सामान्यांसाठी म्हाडाने (MHADA) एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या विविध मंडळांच्या सोडती मध्ये उच्च किंमत किंवा इतर कारणांमुळे विक्रीविना पडून राहिलेली शेकडो रिक्त घरे आता विकण्या ऐवजी ‘भाडेतत्त्वावर’ देण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या अभिनव उपक्रमामुळे मुंबई आणि महामुंबई क्षेत्रात हक्काचे किंवा भाड्याचे घर शोधणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, या प्रक्रियेसाठी म्हाडाकडून एक स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल देखील विकसित केले जात आहे.

          महामुंबई क्षेत्रामध्ये वाढत्या लोकसंख्ये सोबतच भाडेकरूंची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. एका आकडेवारीनुसार, या क्षेत्रात सुमारे २५ टक्के कुटुंबे भाड्याच्या घरात वास्तव्य करतात. शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि विविध व्यवसाय व उद्योगांच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक मुंबई आणि परिसरा मध्ये येतात. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी आणि हक्काच्या घरासोबतच परवडणाऱ्या भाड्याच्या घरांची उपलब्धता वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून म्हाडाने आपल्याकडील पडून असलेल्या रिक्त घरांचा सुयोग्य वापर करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

       या भाडेतत्त्वावरील घरांच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी म्हाडाकडून एका अत्याधुनिक स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलची निर्मिती केली जात आहे. आगामी दिवाळीपूर्वी हे पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी दाट शक्यता आहे. या ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना घर शोधण्यासाठी कोणत्याही दलालांवर (एजंट्सवर) किंवा त्रयस्थ व्यक्तींवर अवलंबून राहावे लागणार नाही. नागरिक थेट या पोर्टलद्वारे उपलब्ध घरांची माहिती घेऊन अर्ज करू शकतील.

        विशेष म्हणजे, या पोर्टलच्या माध्यमातून भाडेकरार (Rent Agreement), पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification), स्टॅम्प ड्युटी भरणे यांसारख्या सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहेत. या डिजिटल व्यवस्थेमुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार असून कागदपत्रांची पूर्तता करताना होणारी अनावश्यक धावपळ पूर्णपणे थांबणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे पडून असलेल्या मालमत्तांचा योग्य वापर होण्या सोबतच मुंबईत येणाऱ्या नवीन नागरिकांना आणि चाकरमान्यांना अत्यंत सुलभ व कायदेशीर मार्गाने हक्काचे भाड्याचे घर मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राजर्षी शाहू महाराजांचा विचारांचा वारसा जपणारी ‘शाहू सृष्टी’ कागलमध्ये

Latest News

राजर्षी शाहू महाराजांचा विचारांचा वारसा जपणारी ‘शाहू सृष्टी’ कागलमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा विचारांचा वारसा जपणारी ‘शाहू सृष्टी’ कागलमध्ये
कोल्हापूरच्या कागलमध्ये २० एकर जागेवर जागतिक दर्जाची 'शाहू सृष्टी' उभारणार. हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून ३ वर्षांत प्रकल्प...
सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा
फलटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजारांची लाच; खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
खंडाळा गांजा प्रकरणाचा ३८ वर्षांचा वनवास; निवृत्त पोलिसांची न्यायासाठी लढाई सुरूच
म्हाडाची नवी योजना; विक्री न झालेली शेकडो घरे आता भाड्याने देणार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software