पुण्यात ड्रग्ज विरोधी कारवाईला वेग; कोंढव्यात ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील कोंढवा पोलिसांनी हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी ड्रग्ज जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या. ८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त.

पुणे: अमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहारांमुळे वारंवार चर्चेत येणाऱ्या पुणे शहरातील कोंढवा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध नशेच्या साहित्यावर मोठा प्रहार केला आहे. कोंढवा पोलिसांनी स्वतंत्रपणे केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ८ लाखांहून अधिक मूल्याचा हायड्रोपोनिक गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) या घातक अंमली पदार्थांसह दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत (NDPS Act) कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

         पहिल्या कारवाईत, कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्तीवर असताना अजमेरा पार्क परिसरात एक व्यक्ती दुचाकीवर संशयास्पद रित्या उभी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत अमीर अकबर शेख (वय ३६, रा. एल के अपार्टमेंट, अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल ५ लाख २१ हजार रुपयांचा १४९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत अंमली पदार्थासह ३,३०० रुपये रोख, २५ हजार रुपयांची दुचाकी आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असा एकूण ५ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

        दुसऱ्या एका कारवाईत, कोंढवा परिसरातील पॅराडाईज इन लॉजमध्ये एक तरुण अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार केशव हिरवे यांना मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने संबंधित लॉजवर अचानक छापा टाकला आणि अजीम सलीम शेख (वय ३७, रा. काशेवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचे १२ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी), ,५०० रुपये रोख, दोन मोबाईल आणि १५ इंजेक्शन सिरींज असा एकूण २ लाख ६४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

       शहरात सातत्याने डोके वर काढणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले आणि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र डोके, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार यांच्यासह पोलीस पथकाने ही धडक कारवाई पार पाडली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस करत असून, या अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा

Latest News

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा
सुट्या खाद्यतेल विक्रीवरील दंडात्मक कारवाईला १ वर्षाची स्थगिती. नियमांनुसार बदलांसाठी एफडीए व व्यापाऱ्यांची संयुक्त समिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय....
फलटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजारांची लाच; खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
खंडाळा गांजा प्रकरणाचा ३८ वर्षांचा वनवास; निवृत्त पोलिसांची न्यायासाठी लढाई सुरूच
म्हाडाची नवी योजना; विक्री न झालेली शेकडो घरे आता भाड्याने देणार
फोटो हटवण्यावरून राजकीय संघर्ष; कृष्णराज महाडिकांचा अमित ठाकरेंवर संताप

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software