प्रशासनाची परवानगी नाही, तरी आंदोलनावर ठाम; लक्ष्मण हाके मुंबईच्या दिशेने

ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम. प्रशासकीय परवानगी नसतानाही मुंबईत आंदोलनाचा इशारा; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सहभागास नकार.

पुणे: ओबीसी आरक्षणाच्या आणि इतर मागण्यांच्या मुद्द्यावरून आता ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेत सध्या आमच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही, अशी भूमिका घेतली आहे; तर दुसरीकडे, आक्रमक ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे प्रशासनाने परवानगी नाकारली तरी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत जाऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. या दोन भिन्न भूमिकांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

       लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेत मुंबईच्या दिशेने धडक देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रशासनाकडून या आंदोलनाला अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही, मात्र यावर तीव्र संताप व्यक्त करत हाके यांनी, "आमचे कोणी ऐकत नाही, मग आम्ही का ऐकायचे? परवानगी असो वा नसो, आम्ही मुंबईत जाणारच," असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शासन आणि प्रशासना समोर एक नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

      दुसरीकडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवले आहे. महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याच्या घडीला ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही, त्यामुळे या आंदोलनात महासंघ सहभागी होणार नाही. महासंघाची ही भूमिका 'वेट अँड वॉच'ची असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रमुख संघटना या आंदोलनात सहभागी होण्यास तयार नसली, तरी लक्ष्मण हाके आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे ओबीसी नेत्यांमधील हा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. या आंदोलनामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा

Latest News

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा
सुट्या खाद्यतेल विक्रीवरील दंडात्मक कारवाईला १ वर्षाची स्थगिती. नियमांनुसार बदलांसाठी एफडीए व व्यापाऱ्यांची संयुक्त समिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय....
फलटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजारांची लाच; खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
खंडाळा गांजा प्रकरणाचा ३८ वर्षांचा वनवास; निवृत्त पोलिसांची न्यायासाठी लढाई सुरूच
म्हाडाची नवी योजना; विक्री न झालेली शेकडो घरे आता भाड्याने देणार
फोटो हटवण्यावरून राजकीय संघर्ष; कृष्णराज महाडिकांचा अमित ठाकरेंवर संताप

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software