फोटो हटवण्यावरून राजकीय संघर्ष; कृष्णराज महाडिकांचा अमित ठाकरेंवर संताप

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्यावरून मनसे-भाजयुमो आमने-सामने. अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल, कृष्णराज महाडिकांची कडक टीका.

पुणे: पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो वर आक्षेप घेत तो हटवल्याचा वाद आता राज्यभरात पेटला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले असून, भाजयुमो आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या संपूर्ण वादावर भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेत, अमित ठाकरे यांना ‘आधी संविधानाचा आणि प्रोटोकॉलचा अभ्यास करा,’ असा सज्जड सल्ला दिला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

          नुकत्याच पुणे दौऱ्यावर गेलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो लावण्यावर आक्षेप घेत त्यांनी तो तातडीने काढण्यास सांगितला, त्यानंतर मनसेच्या एका कार्यकर्त्याने भिंतीवरील हा फोटो काढून टाकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपने या कृतीचा निषेध करत कडक कारवाईची मागणी केली आणि मंगळवारी मुंबईत भाजयुमोच्या वतीने जोरदार निदर्शने पुकारण्यात आली.

        या आंदोलना दरम्यान मुंबईत मनसे आणि भाजयुमोचे कार्यकर्ते परस्परांना भिडले, ज्यामुळे काही काळ धक्काबुक्की आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावणे हा अधिकृत प्रोटोकॉलचा भाग असून, शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आधी संविधानाचा अभ्यास करावा, असा टोमणा त्यांनी अमित ठाकरेंना लगावला.

      शांततापूर्ण आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी येऊन धिंगाणा घातल्याचा आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाडिक यांनी केली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापले असतानाच प्रशासना कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा

Latest News

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा
सुट्या खाद्यतेल विक्रीवरील दंडात्मक कारवाईला १ वर्षाची स्थगिती. नियमांनुसार बदलांसाठी एफडीए व व्यापाऱ्यांची संयुक्त समिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय....
फलटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजारांची लाच; खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
खंडाळा गांजा प्रकरणाचा ३८ वर्षांचा वनवास; निवृत्त पोलिसांची न्यायासाठी लढाई सुरूच
म्हाडाची नवी योजना; विक्री न झालेली शेकडो घरे आता भाड्याने देणार
फोटो हटवण्यावरून राजकीय संघर्ष; कृष्णराज महाडिकांचा अमित ठाकरेंवर संताप

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software