पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ; आता प्रतिकिलो ९७.७५ रुपये

MNGL कडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ. नवीन दर प्रति किलो ९७.७५ रुपये लागू.

पुणे: पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि जागतिक बाजारातील ऊर्जा तुटवड्याचा फटका आता वाहन धारकांच्या खिशाला बसू लागला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहनांसाठीच्या सीएनजीच्या (CNG) दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ केली आहे. हे नवे दर ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री पासून म्हणजेच १ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाले असून, या दरवाढीनंतर आता पुणेकरांना सीएनजीसाठी प्रति किलो ९७.७५ रुपये मोजावे लागणार आहेत.

            आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा हा थेट परिणाम असल्याचे कंपनी कडून स्पष्ट करण्यात आले आहे. जुलै २०२६ पासून पश्चिम आशियातील संकट अधिक तीव्र झाल्यामुळे ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावरून होणाऱ्या एलएनजीच्या (LNG) वाहतुकीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. जागतिक ऊर्जा व्यापारातील हा मार्ग प्रभावित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट एलएनजीच्या किमती संकटा पूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यातच आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपमध्ये नैसर्गिक वायूचा साठा वाढवण्याची लगबड सुरू असल्याने जागतिक बाजारावरील दबाव आणखी वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत पुरवठ्यावर झाला आहे.

         भारतामध्ये आर्थिक विकासाचा वेग वाढल्यामुळे सीएनजीची मागणी वेगाने वाढली आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील पुरवठ्याचा मोठा हिस्सा आयात केलेल्या महागड्या स्पॉट एलएनजी मधून भागवावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील हे गगनचुंबी दर आणि उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेता, या अतिरिक्त खर्चाचा संपूर्ण भार ग्राहकांवर न टाकता एमएनजीएलने मोठा हिस्सा स्वतःच्या पातळीवर सोसला आहे आणि त्यातील केवळ काही भाग ग्राहकांवर लादल्यामुळे दरवाढ मर्यादित ठेवण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

      दरम्यान, या दरवाढी नंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी हा वाहन धारकांसाठी किफायतशीर पर्याय कायम राहिला आहे. सध्याच्या इंधन दरांचा विचार करता प्रवासी कारसाठी पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के, डिझेलच्या तुलनेत सुमारे २३ टक्के तर ऑटोरिक्षांसाठी सुमारे २५ टक्के आर्थिक बचत वाहनधारकांची होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच, या दरवाढीचा कोणताही परिणाम घरगुती वापराच्या पाईप युक्त नैसर्गिक वायूवर (PNG) झालेला नाही, त्यामुळे पीएनजीचे दर पूर्वी प्रमाणेच अबाधित ठेवण्यात आले आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा

Latest News

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा
सुट्या खाद्यतेल विक्रीवरील दंडात्मक कारवाईला १ वर्षाची स्थगिती. नियमांनुसार बदलांसाठी एफडीए व व्यापाऱ्यांची संयुक्त समिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय....
फलटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजारांची लाच; खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
खंडाळा गांजा प्रकरणाचा ३८ वर्षांचा वनवास; निवृत्त पोलिसांची न्यायासाठी लढाई सुरूच
म्हाडाची नवी योजना; विक्री न झालेली शेकडो घरे आता भाड्याने देणार
फोटो हटवण्यावरून राजकीय संघर्ष; कृष्णराज महाडिकांचा अमित ठाकरेंवर संताप

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software