- Hindi News
- पुणे
- लोहगावमध्ये बंद घर फोडून पावणेसात लाखांचा ऐवज लांबवला; अज्ञात चोरावर गुन्हा दाखल
लोहगावमध्ये बंद घर फोडून पावणेसात लाखांचा ऐवज लांबवला; अज्ञात चोरावर गुन्हा दाखल
लोहगाव (पुणे):
लोहगाव परिसरातील संतनगर येथे घर बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ६ लाख ८० हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. यामध्ये १ लाख २० हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आणि महागड्या घड्याळाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतनगर, लोहगाव-वाघोली रोड येथील इगल फार्म हाऊस (स सर्व्हे नं. १६७/२) जवळील एका ६० वर्षीय नागरिकाचे घर २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:०० ते २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० या कालावधीत कुलूप लावून बंद होते. या दरम्यान अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले १,२०,००० रुपये रोख, सोन्या-चांदीचे व डायमंडचे दागिने तसेच घड्याळ असा एकूण ६,८०,४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी ६० वर्षीय तक्रारदाराच्या फिर्यादीवरून लोहगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल (गु.र.नं. २५६/२०२६) करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
