महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्राचे लक्ष; शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या दौऱ्यावर येणार

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३ ऑक्टोबरनंतर पाहणी दौऱ्यावर येणार आहेत.

नवी दिल्ली: महाराष्ट्रात पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे निर्माण झालेली अत्यंत भीषण दुष्काळी परिस्थिती आणि बळीराजाचे झालेले अतोनात नुकसान आता राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारच्या दरबारात पोहोचले आहे. राज्य सरकारने दोन दिवसा पूर्वीच राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर केल्यानंतर, आता केंद्र सरकारनेही या गंभीर संकटाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. देशाचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून, ते स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय पथकासह आगामी ३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. राज्यातील सुमारे दोन-तृतीयांशाहून अधिक क्षेत्र दुष्काळाच्या विळख्यात सापडले असल्याचे स्पष्ट करत केंद्र सरकार या संकटात राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

         गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ राज्यात पावसाचा मान्सून नसल्‍यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस यांसारखी सोन्यासारखी पिके पूर्णपणे जळून व वाळून खाक झाली आहेत. बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल व हतबल झाला असून, खरीप हंगामाच्या या अथांग नुकसानी नंतर आता आगामी रब्बी हंगामाच्या भवितव्याबद्दलही मोठी धाकधूक निर्माण झाली आहे. या सर्व बिकट पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे ७५ टक्के भागाचा समावेश असलेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करत दिलासा दायक पाऊल उचलले आहे. आता यामध्ये केंद्र सरकारची थेट एंट्री झाल्यामुळे आणि केंद्रीय कृषीमंत्री स्वतः पाहणी करणार असल्यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

        नियोजित प्रवासा नुसार, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय केंद्रीय पथक आगामी ३ ऑक्टोबर नंतर राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करून पाहणी करणार आहे. या पाहणी दौऱ्या दरम्यान प्रत्यक्ष शिवारात जाऊन पिकांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थितीची भीषणता पाहता केंद्र सरकार कडून लवकरच एका विशेष आणि भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र शासन या संकटाबाबत अत्यंत संवेदनशील असून, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास यामुळे निर्माण झाला असून या महत्त्वाच्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी

Latest News

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी
इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने स्टारशिपच्या १४व्या चाचणीत इतिहास रचत यान पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले व २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वीरीत्या सोडले....
महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्राचे लक्ष; शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या दौऱ्यावर येणार
दिवाळीच्या रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांची धावपळ; बुकिंग सुरू होताच तिकिटे फुल्ल,वेटिंग’चा मनस्ताप
एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना शरद पवारांचा स्पष्ट नकार; यायचं असेल तर आमच्यासोबत या
हुंड्याच्या छळाचा आरोप अन् वैष्णवीचा दुर्दैवी अंत; नवविवाहित आयटी अभियंतेच्या मृत्यूने पुण्यात खळबळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software