पुण्यात डीजे नियमाचा बोजवारा? मध्यवर्ती भागात नियंत्रण, उपनगरांत आवाज कायम

पुण्यात मध्यवर्ती भागात डीजे नियंत्रणात, तर उपनगरांमध्ये आवाजाचा दणदणाट. ११०० मंडळांच्या ध्वनी मोजणीनंतर नियम मोडणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई.

पुणे: पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेले नियम आणि ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा यामुळे मध्यवर्ती भागातील ध्वनि प्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात राहिल्याचे दिसून आले आहे. मात्र, याउलट परिस्थिती शहराच्या विविध उपनगरांमध्ये पाहायला मिळत असून, तिथे नियमांना हरताळ फासून डीजेचा प्रचंड दणदणाट सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या अशा मंडळांवर आता पुणे पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

      उत्सवापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालया कडून सर्व गणेश मंडळांसाठी ‘चार बेस, चार टॉप’ साऊंड सिस्टीमची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. तसेच उत्सवा दरम्यान ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेचे तंतोतंत पालन करण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या होत्या. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मध्यवर्ती भागातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नियंत्रणात आणि नियमांत राहून उत्सव साजरा केला. परंतु, याउलट शहरातील उपनगरांतील काही मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष करत क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक तीव्रतेची ध्वनिव्यवस्था वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकारची दखल घेत पोलिसांनी धडक कारवाई करत काही ठिकाणचे साऊंड यंत्रणेचे साहित्य व ध्वनिवर्धक जप्त केले आहेत.

     पोलीस प्रशासना कडून शहरातील तब्बल ११०० हून अधिक गणेशोत्सव आणि दहीहंडी मंडळांच्या ठिकाणच्या ध्वनी पातळीची वैज्ञानिक मोजणी करण्यात आली आहे. या नोंदींची कसून तपासणी करून ठरवून दिलेली मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून बिबवेवाडी परिसरात मोठ्या आवाजात साऊंड वाजवून मोठ्या प्रमाणावर ध्वनि प्रदूषण केल्याप्रकरणी एका मंडळा विरोधात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘डीजे विरोधी पुणेकर मंचा’ने केलेल्या दाव्यानुसार, शहरातील तब्बल ५९ ठिकाणी ध्वनी मर्यादेचे स्पष्ट उल्लंघन झाले असून, त्यापैकी ३३ ठिकाणी आवाजाची तीव्रता थेट १०० डेसिबलपेक्षाही अधिक नोंदवली गेल्याचे म्हटले आहे.

       पोलिस प्रशासनाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे की, जरी काही मंडळांनी कागदोपत्री किंवा प्रत्यक्ष पाहणीत ‘चार बेस, चार टॉप’ या निकषांचे पालन केले असले, तरी प्रत्यक्षात डेसिबल मोजणी करताना ध्वनिची पातळी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास अशा प्रत्येक मंडळावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण विषयक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे प्रत्येक मंडळाला बंधनकारक असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही कसूरदारांना पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पुणे शहरातील मंडळांमध्ये धाक निर्माण झाला असून, आगामी दिवसांत ध्वनि प्रदूषणा विरुद्धची ही कारवाई अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पेपरफुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; टास्क फोर्सवर सवाल

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software