जेंझींच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर; युवा मतदारांसाठी आखला खास मास्टर प्लॅन

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर शिवसेना (शिंदे गट) सतर्क. Gen-Z तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी रणनीती.

मुंबई: दिल्लीतील जंतर मंतर वर नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक आणि मोठ्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली तरुणाई, विशेषतः 'जेंझी' (Gen Z) पिढीच्या आक्रमक रेट्यामुळे केंद्र सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला असून, आंदोलनाच्या दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच अशा स्वरूपाचे मोठे जनआंदोलन पाहायला मिळाले आहे. या राष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) अतिशय सावध आणि आक्रमक पवित्रा घेत मोठा मास्टर प्लॅन आखला आहे.

आगामी २०२९ मध्ये देशात लोकसभेच्या आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. २०२९ पर्यंत देशात तब्बल ३८ कोटी तरुण हे 'जेंजी' मतदार असणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत तरुण मतदारांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार हे लक्षात घेऊन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच खबरदारी घेत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जेंझी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेने लवकरच एका विशेष बैठकीचे आयोजन केल्याची माहिती मिळाली आहे.

जेंझी तरुण मतदारांचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांच्या भाषा व प्रश्नांशी जोडले जाण्यासाठी शिवसेनेतर्फे एका योग्य आणि प्रभावी युवा चेहऱ्याची निवड केली जाणार आहे. यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या तरुण मुलांवर तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांमध्ये तरुणांचे नेतृत्व करणाऱ्या तडफदार युवा चेहऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्याची पक्षाची रणनिती आहे. केवळ शहरांमध्येच नव्हे, तर ग्रामीण भागापर्यंत पसरलेल्या या तरुण मतदारांसाठी स्वतंत्र युवा मेळाव्यांचे आयोजन करण्याबाबत पक्षांतर्गत गांभीर्याने विचार सुरू आहे. तरुणांच्या जिव्हाळ्याच्या आणि रोजगाराच्या प्रश्नांवर आतापासूनच धोरणात्मक काम करण्याच्या स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी व नेत्यांना दिल्या आहेत.

देशात नीट (NEET) परीक्षा पेपर फुटी आणि अन्य शैक्षणिक मुद्द्यांमुळे हे अवाढव्य विद्यार्थी आंदोलन उभे राहिले होते. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने संसदेत कठोर 'परीक्षा सुधारणा विधेयक' मंजूर केले आहे. दरम्यान, २० जुलै रोजी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वतीने संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते, ज्याची देशभरात मोठी चर्चा झाली. अनेक नामवंत सेलिब्रिटी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या विद्यार्थी आंदोलनाला खुला पाठिंबा जाहीर केला होता. देशातील वाढती युवा संख्या आणि आगामी निवडणुकांचे राजकारण पाहता, भाजप आणि शिवसेनेने आतापासूनच युवा मतदारांना सामावून घेण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मुंबई उपनगरातील विकास कामांना वेग; आशिष शेलारांचे प्रशासनाला निर्देश

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software