कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार का? संस्थापक अभिजीत दीपकेने स्पष्टच सांगितलं

कॉकरोच जनता पार्टी (CJP) निवडणूक लढवणार की नाही? छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केली भूमिका.

छत्रपती संभाजीनगर: देशभरात आपल्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या आणि केंद्र सरकारला मोठा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेला हा तरुण वर्ग आणि विद्यार्थ्यांचा लढा आता रस्त्यावर उतरला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी संस्थापक अभिजीत दीपके यांनी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीपूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कॉकरोच जनता पार्टी आगामी काळात निवडणूक रिंगणात उतरणार का? असा सवाल विचारला असता, अभिजीत दीपके यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे.

मीडियाशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, "मला असं वाटतं की, प्रसार माध्यमांना या गोष्टीची जास्त उत्सुकता लागली आहे की आम्ही एखादा राजकीय पक्ष बनवावा. मात्र, या देशात आधीच जेवढे राजकीय पक्ष आहेत, मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्या एकूण कारभारापासून आणि राजकारणा पासून निराश आहात. आम्हाला हा पक्ष किंवा राजकारण न ठेवता एक 'सामाजिक चळवळ' म्हणून पुढे चालवायची आहे. देशातली सद्यस्थिती पाहता आणखी एक नवीन राजकीय पक्ष बनवून नेमके काय साध्य होणार?"

सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर कडाडून टीका करताना अभिजीत दीपके पुढे म्हणाले की, "सामान्यांचा आणि तरुणांचा राजकारणावरचा विश्वास दिवसेंदिवस पूर्णपणे उठत चालला आहे. आज सकाळी लोक एका पक्षाला मतदान करतात, तर संध्याकाळी समीकरणे बदलून सरकार दुसऱ्याच पक्षाचे बनलेले असते. सकाळी जो नेता आमदार किंवा खासदार म्हणून निवडून येतो, तोच संध्याकाळी दुसऱ्या पक्षात गेलेला असतो."

दरम्यान, एका बाजूला कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांची आणि युवा वर्गची संख्या वेगाने वाढ होत असताना आणि देशाच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण झाला असतानाही, सध्यातरी हा पक्ष राजकीय निवडणुकांच्या मैदानात उतरणार नसून ती एक सामाजिक चळवळच राहणार असल्याचे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मुंबई उपनगरातील विकास कामांना वेग; आशिष शेलारांचे प्रशासनाला निर्देश

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software