२४ तासांत तीन अल्पवयीन मुलांचा शोध; वाई पोलिसांची तत्पर कारवाई

वाई पोलिसांनी सीसीटीव्ही आणि ३ शोध पथकांच्या मदतीने बेपत्ता ३ अल्पवयीन मुलांना २४ तासांत सुखरूप शोधून पालकांच्या ताब्यात दिले.

वाई : वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या २४ तासांत तीन अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तीन स्वतंत्र शोध पथकांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी करण्यात आली.

१ ऑगस्ट २०२६ रोजी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार बीएनएसएस कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तीन स्वतंत्र शोध पथके तयार केली.

एक पथकाने वाई शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, तर इतर दोन पथके मांढरदेवी आणि पाचगणी परिसरात रवाना झाली. तपासादरम्यान एमआयडीसी चांदणी चौक येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीनही मुले दिसून आल्याने शोधमोहीम बोपर्डी परिसरात केंद्रित करण्यात आली.

पोलिसांनी बोपर्डी, धावडी, लोहारे, सुलतानपूर आणि शेलारवाडी परिसरात मुलांचे फोटो दाखवत शोध मोहीम राबवली. दरम्यान, आयटीआय महाविद्यालया जवळील डोंगर परिसरात तीनही मुले दिसून आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांचा पाठलाग केला. अखेर रेणुसे वस्ती परिसरातून तिन्ही मुले सुखरूप ताब्यात घेण्यात आली.

तपासात ही तिन्ही मुले मित्र असून सायकलवर फिरत फिरत दूर निघून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मुंबई उपनगरातील विकास कामांना वेग; आशिष शेलारांचे प्रशासनाला निर्देश

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software