'मातोश्री'वर ठाकरेंच्या बैठकीत दोन गट भिडले; उद्धव ठाकरे प्रचंड संतापले

मातोश्रीवर ठाणे आणि कल्याणच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली. उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दीपके यांचे उदाहरण देत सुनावले खडे बोल.

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी एका महत्त्वाच्या बैठकी दरम्यान दोन गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि वाद झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या अंतर्गत राड्यामुळे मातोश्रीवरील वातावरण काही काळ चांगलेच तापले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच झालेल्या या प्रकारामुळे ते देखील प्रचंड संतापले असून, त्यांनी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत कडक शब्दांत तबीहत सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी राजकीय रणनीती आणि पक्षसंघटनेच्या आढाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे आणि कल्याणमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत स्थानिक पातळीवरील वाद आणि गटबाजीवरून ठाणे व कल्याणच्या पदाधिकाऱ्यांचे दोन गट आपसात भिडले. सर्वांसमोर सुरू असलेल्या या खडाजंगीमुळे बैठकीत मोठा गोंधळ उडाला.

आपल्याच पक्षाचे पदाधिकारी बैठकीत आपापसात भांडत असल्याचे पाहून उद्धव ठाकरे कमालीचे संतापले. त्यांनी या दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांना खडसावत खडे बोल सुनावले. यावेळी संताप व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांचे उदाहरण दिले. "देशातील एक तरुण रस्त्यावर उतरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आव्हान देतोय, आणि तुम्ही मात्र पक्षातच आपापसात भांडत बसलाय! तुमच्या या किरकोळ आणि गटबाजीच्या वागण्याला नेमका काय अर्थ उरला आहे?" असा थेट आणि खडा सवाल करत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनाविले. त्यांच्या या कडक भूमिकेमुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली होती.

शिवसेना पक्षात झालेल्या ऐतिहासिक फुटानंतर आणि नुकत्याच काही खासदारांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे आता अत्यंत आक्रमक आणि अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहेत. पक्ष पुन्हा संघटित करण्यासाठी ते सातत्याने जिल्हाप्रमुख, विधानसभा मतदार संघाचेप्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत पक्षाचा आढावा घेत आहेत. मात्र, अशा महत्त्वाच्या आणि संवेदनशील बैठकांमध्येच पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येत असल्याने आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आपापसातच राडा होत असल्याने पक्षासमोर नवीन अंतर्गत आव्हाने उभी राहिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मुंबई उपनगरातील विकास कामांना वेग; आशिष शेलारांचे प्रशासनाला निर्देश

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software