गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाला वेग; भरत गोगावले यांची पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरत गोगावले यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी. ३-४ दिवसांत खड्डे बुजवून कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश.

रायगड: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारी चाकर मान्यांची वाट सुकर, सुरक्षित आणि विनाअथळा व्हावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सक्रिय झाली आहे. याचाच एक भाग म्हणून रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्वतः मैदानात उतरत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ कार्यालयीन अहवाल मागवण्या ऐवजी किंवा कागदी घोडे नाचवण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी थेट घटना स्थळी भेट देऊन महामार्गावरील खड्डे, रस्ते दुरुस्तीची कामे आणि इतर तांत्रिक अडचणींचा सखोल आढावा घेतला. प्रवाशांच्या सुरक्षेला आणि सोयीला प्राधान्य देत संबंधित यंत्रणांना तातडीने आणि युद्धपातळीवर उपाय योजना करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत.

        पनवेल मधील पळस्पे परिसरापासून सुरू झालेल्या या उच्चस्तरीय पाहणी दौऱ्यात पालकमंत्री भरत गोगावले यांच्यासह जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, प्रांताधिकारी प्रविण पवार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था किंवा वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे, त्या प्रत्येक ठिकाणी थांबून पालक मंत्र्यांनी ताफा थांबवून पाहणी केली. विशेषतः रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि परिणाम स्वरूपी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते, हे लक्षात घेता, एका ठिकाणी सुरू असलेले दुरुस्तीचे काम पुढील तीन ते चार दिवसांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. रस्त्याशी संबंधित कोणतीही अडचण प्रलंबित राहता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.

         गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसराबाट लाखो चाकरमानी आपल्या गावी कोकणात जात असतात. रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर भागांकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा प्रवास कोणत्याही त्रासाविना पार पडावा, ही शासनाची प्रमुख जबाबदारी असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. यापूर्वी प्रशासकीय स्तरावर शांतता समितीची बैठक पार पडल्यानंतर, अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह थेट माणगाव पर्यंत महामार्गाचा दौरा करण्यात आला. मार्गावरील अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर तत्काळ तोडगा काढल्यामुळे ऐन सणाच्या वेळी प्रवाशांना होणारा त्रास वाचणार आहे. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

        दरम्यान, गणेशोत्सवा सारख्या गर्दीच्या काळात अथांग जनसागर असतानाही वाहतूक नियंत्रणात ठेवण्याची अत्यंत कठीण जबाबदारी पार पाडणाऱ्या रायगड पोलिसांच्या कार्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी विशेष कौतुक केले. प्रचंड गर्दी, वादविवाद आणि वाहतूक कोंडीच्या आव्हानात्मक परिस्थितीतही पोलीस दल ज्या प्रकारे अहोरात्र मेहनत घेऊन महत्त्वाची भूमिका बजावते, त्याचे त्यांनी अभिनंदन केले. उत्तम काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी कौतुक करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाचा उत्साह वाढवला. पालकमंत्र्यांच्या या प्रत्यक्ष पाहणी आणि धडक दौऱ्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि चाकर मान्यांचा आगामी प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार

Latest News

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार
नेपाळ पूरपरिस्थितीत भारताने पाठवली १० टन मदत सामग्री. संबंध सुधारल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा पहिला भारत दौरा ठरण्याची शक्यता....
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंडाबळीची धक्कादायक घटना; २ कोटींसाठी विवाहितेचा छळ
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मोठी पावले; लष्करी संवाद अधिक दृढ करण्यासह आठ मुद्द्यांच्या सहमतीवर शिक्कामोर्तब
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर स्वच्छतेवर भर द्या; उच्च न्यायालयाचे निर्देश

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software