रक्षारक्षक म्हणून वृक्षांचे जतन; सातारा व तासगाव येथे विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सातारा व तासगाव येथे विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन व संजय काळे विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.

सातारा: रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे आणि सुरक्षेचे प्रतीक मानला जातो, परंतु या परंपरेला निसर्ग संवर्धनाची जोड देत सातारा आणि तासगाव येथील विद्यार्थ्यांनी एक अत्यंत प्रेरणादायी आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा आणि संजय भैरवनाथ काळे विद्यालय, तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाचे औचित्य साधत पर्यावरणपूरक राखी बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी केवळ नैसर्गिक साहित्यातून आकर्षक राख्या तयार केल्या नाहीत, तर थेट विद्यालयाच्या परिसरातील वृक्षांना राखी बांधून ‘वृक्षांचे रक्षण करूया, पर्यावरणाचे संवर्धन करूया’ असा मोलाचा संदेश दिला आहे.

      विद्यार्थ्यांमध्ये लहान पणापासूनच पर्यावरणा विषयी जाणीव निर्माण व्हावी आणि पारंपरिक सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याची संस्कृती रुजावी, या मुख्य उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नैसर्गिक, पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून अत्यंत सुंदर आणि आकर्षक राख्या बनवल्या. मानवी जीवनासाठी प्राणवायू, सावली आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून निसर्गाच्या रक्षणाचा आणि संगोपनाचा दृढ संकल्प केला.

       या संपूर्ण उपक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. व्ही. एस. नलवडे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. धोंडगे, आंतरवासिता विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. रवलेकर, गट मार्गदर्शक प्रा. डॉ. एस. एस. वाघमारे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. ए. बैताडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बी.एड.च्या सर्व छात्राध्यापकांनी या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अत्यंत उत्साहात पार पाडले. रक्षाबंधन हा सण केवळ मानवी नातेसंबंधापुरتا मर्यादित न राहता, मानवाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते जपण्याची प्रेरणा देणारा ठरावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार

Latest News

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार
नेपाळ पूरपरिस्थितीत भारताने पाठवली १० टन मदत सामग्री. संबंध सुधारल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा पहिला भारत दौरा ठरण्याची शक्यता....
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंडाबळीची धक्कादायक घटना; २ कोटींसाठी विवाहितेचा छळ
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मोठी पावले; लष्करी संवाद अधिक दृढ करण्यासह आठ मुद्द्यांच्या सहमतीवर शिक्कामोर्तब
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर स्वच्छतेवर भर द्या; उच्च न्यायालयाचे निर्देश

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software