पिंपरी-चिंचवडमध्ये हुंडाबळीची धक्कादायक घटना; २ कोटींसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये २ कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी विवाहितेची आत्महत्या. पतीसह सासरच्या ४ जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू.

पिंपरी-चिंचवड: पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. माहेरच्या संपत्तीतून जमीन खरेदी करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या अमानुष शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका उच्चभ्रू कुटुंबातील विवाहित महिलेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या वर्षी राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित वैष्णवी हगवणे प्रकरणाची जणू पुनरावृत्तीच या घटनेमुळे झाल्याचे दिसून येत असून, हुंडाबळीच्या या भीषण वास्तवाने संपूर्ण पुणे शहर पुन्हा एकदा सुन्न झाले आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या चार जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस कसून तपास करत आहेत.

        शिल्पा सचिन गवारे असे टोकाचे पाऊल उचलून मृत पावलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शिल्पाचा विवाह उच्चभ्रू कुटुंबात झाला होता, मात्र लग्नानंतर काही कालावधीतच तिच्या सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू करण्यात आला. माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागून जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये घेऊन येण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता. आरोपी पती उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे, सासरे आणि दीर यांनी मिळून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला. पती दारू पिऊन येऊन तिला नाहक त्रास देत असल्याचे समोर आले आहे. या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून शिल्पाने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला आणि जगाचा निरोप घेतला.

       या घटनेमुळे मृत शिल्पाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या भावाने दिलेली माहिती काळीज पिळवटून टाकणारी आहे. उद्या रक्षाबंधनाचा सण असताना आणि बहिणीला राखी बांधण्यासाठी हात शिवत असतानाच बहीणच जगात नसल्याचा हंबरडा तिच्या भावाने फोडला. "माझी बहीण नाहीये आता मला राखी बांधायला, गेली ती सोडून आम्हाला... सासरच्या लोकांनी छळून-छळून मारलं हो तिला," असे म्हणत तिचा भाऊ ढसाढसा रडला. घटनेच्या रात्री उशिरा भावाला फोन करून प्रकृती बिघडल्याचे व हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर शिल्पा आधीच स्ट्रेचरवर मृत अवस्थेत पडल्याचे पाहून पायाखालची जमीनच सरकल्याचे त्याने सांगितले.

        याप्रकरणी मृत शिल्पाच्या भावाच्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी पती उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे यांच्यासह इतर संबंधित आरोपीं विरोधात हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबांमध्येही हुंड्यासारख्या अघोरी प्रवृत्तीमुळे निष्पाप महिलांचे बळी जात असल्याची ही अत्यंत गंभीर घटना आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत असून वाकड पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार

Latest News

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार
नेपाळ पूरपरिस्थितीत भारताने पाठवली १० टन मदत सामग्री. संबंध सुधारल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा पहिला भारत दौरा ठरण्याची शक्यता....
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंडाबळीची धक्कादायक घटना; २ कोटींसाठी विवाहितेचा छळ
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मोठी पावले; लष्करी संवाद अधिक दृढ करण्यासह आठ मुद्द्यांच्या सहमतीवर शिक्कामोर्तब
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर स्वच्छतेवर भर द्या; उच्च न्यायालयाचे निर्देश

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software