पुण्यात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राला वेग; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पुणे-नाशिक महामार्गावरील ९४.८७ हेक्टरवरील PIECC प्रकल्पाची पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून पाहणी. प्रकल्पाच्या कामाला वेग.

पुणे: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत ९४.८७ हेक्टर क्षेत्रावर साकारण्यात येत असलेल्या बहुप्रतिक्षित ‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ (PIECC) या महात्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला आता अधिक वेग आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नुकतीच या प्रकल्पाच्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची आणि नियोजनाची सविस्तर पाहणी केली. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेला आणि ‘लँड मॉनिटायझेशन सेल’ला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

      या पाहणी दौऱ्या दरम्यान आयुक्तांनी प्रकल्पांतर्गत व्हीआयपी लाउंज, स्वच्छतागृहे तसेच आगामी ‘इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (IMTMA) च्या प्रस्तावित प्रदर्शनस्थळाची पाहणी केली. प्रकल्पाची देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देतानाच, उपस्थितांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या पाहणीवेळी पीएमआरडीएचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, उपायुक्त (जमीन व मालमत्ता) हिम्मत खराडे, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमान भोसले, उपअभियंता शंकर कोळेकर यांच्यासह लँड मॉनिटायझेशन सेलचे सल्लागार उपस्थित होते.

       हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेशातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि आधुनिक शहरी केंद्र म्हणून विकसित केला जात आहे. या भव्य प्रकल्पाच्या आराखड्यात सुमारे एक कोटी चौरस फूट विक्रीयोग्य जागा, २४ हजार वाहनांसाठी भव्य पार्किंगची सुविधा, एक समर्पित मेट्रो स्टेशन, अंतर्गत मोनो-रेल, आणि सहा शहरी गावांना सेवा देणारे भूमिगत पार्किंग पॉड्स यांचा समावेश आहे. याशिवाय, मरीना असलेला एक सुंदर तलाव, ‘पुणे आय व्हील’ (Pune Eye Wheel), जागतिक दर्जाचे प्रदर्शन केंद्र, हॉटेल्स आणि अत्याधुनिक परिषद सुविधा या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

        या प्रकल्पाची रचना प्रवासी व नागरिकांसाठी अतिशय सोयीस्कर व आधुनिक स्वरूपात डिझाइन करण्यात आली आहे. मेट्रो स्टेशनला थेट या केंद्राच्या प्रवेशद्वाराशी जोडणारा एक आकर्षक स्कायवॉक उभारला जाणार असून, तो एका भव्य ‘व्हरांड्यासारख्या’ पॅव्हेलियन असलेल्या ‘सिटी गेटवे’मधून जाईल. विशेष म्हणजे, हे सिटी गेटवे केवळ एक साधे प्रवेशद्वार नसून आगमन आणि प्रस्थान कक्षांसह आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल प्रमाणे डिझाइन केलेले एक बहुविध वाहतूक केंद्र (Multi-modal Transport Hub) असणार आहे. या प्रकल्पा मुळे पुणे शहराचा जागतिक पातळीवर व्यावसायिक आणि व्यापारी विस्तार होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जरांगे-पाटलांच्या प्रकृतीने आंदोलनाला धार; धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

Latest News

जरांगे-पाटलांच्या प्रकृतीने आंदोलनाला धार; धुळे-सोलापूर महामार्ग रोखला जरांगे-पाटलांच्या प्रकृतीने आंदोलनाला धार; धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस. प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक आक्रमक; धुळे-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको....
ओबीसी निधी वितरणात दिरंगाई नको; बावनकुळेंचे वित्त विभागाला निर्देश
पुण्यात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राला वेग; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी
पुण्यातील डीजे प्रकरणी मानवाधिकार आयोगाची कारवाई; एमपीसीबीला अहवालाचे आदेश
फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software