मराठवाड्याची लेक म्हणून प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी; परभणीत सुनेत्रा पवारांचा बळीराजाला मोठा दिलासा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परभणीत शेतावर जाऊन दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत, चारा-पाणी आणि पारदर्शक पंचनाम्याचे निर्देश.

परभणी: पावसाने मोठा खंड दिल्यामुळे मराठवाड्यात निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बळीराजाला मोठा आधार दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज परभणी जिल्ह्याचा प्रत्यक्ष दौरा करत थेट शेतशिवारात पाऊल ठेवले आणि नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी केली. संकटाच्या या बिकट काळात शासन कधीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे स्पष्ट करत उभ्या पिकांचे नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सर्वतोपरी मदत करण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

        उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी आज परभणी जिल्ह्यातील मरडसगाव (ता. पालम/गंगाखेड), दैठणा (ता. परभणी) आणि पाथरी परिसराचा दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी मरडसगाव येथील अझर अहमद मोहोयुद्दीन सरवर, दैठणा येथील शेषराव हरिभाऊ गायकवाड आणि पाथरी येथील बालासाहेब साहेबराव नाईक यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाच्या लहरीपणामुळे आणि प्रदीर्घ खंडामुळे करपून गेलेली सोयाबीन व इतर खरीप पिके त्यांनी जवळून पाहिली. यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या व्यथा, भविष्यातील पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत आत्मीयतेने ऐकून घेतला. “मी स्वतः मराठवाड्याची लेक आहे, त्यामुळे येथील मातीतील वेदना आणि शेतकऱ्यांचे अश्रू मला अगदी जवळून माहीत आहेत,” असे भावनिक उद्गार काढत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि ‘हिम्मत खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’ असा विश्वास निर्माण केला.

        राज्यातील खरीप हंगामातील भीषण परिस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, शासनाने या संकटाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील २६५ तालुक्या मध्ये दुष्काळी उपाय योजना लागू करण्याचा शासनाने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देणारा असून, या सर्व योजनांचा व उपायांचा प्रत्यक्ष लाभ परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना मिळणार आहे. प्रशासनाला तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पारदर्शक पद्धतीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, शासनाच्या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची काटेकोर दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

          दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी प्रशासनाला आधीच निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धते बाबत शासन सर्व आवश्यक त्या उपाय योजना युद्धपातळीवर राबवत आहे. तसेच, या नैसर्गिक संकटाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती येऊ नये, यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्या बाबतही शासन पूर्णपणे सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांच्या सोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश विटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, माजी आमदार मधुसुदन केंद्रे, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय यंत्रणेने संपूर्ण संवेदनशीलतेने काम करत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, असे निर्देश देत शासनाने बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी कंबर कसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?

Latest News

पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?  पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?
पुणे: पुणे शहरातील ऐतिहासिक आणि उत्साही गणेश विसर्जन मिरवणूक यंदा एकूण ३३ तास २७ मिनिटांत अत्यंत शांततेत व उत्साहात पार...
गणपती विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांकडून ११ जणांना अटक, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद; बनावट ओळखपत्र दाखवून उकळत होता हजारो रुपये
गणेशोत्सवात पुणे मेट्रोची विक्रमी भरारी; १२ दिवसांत ४८ लाखांहून अधिक प्रवासी, ७.४९ कोटींची कमाई
पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक; शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला घेरले, आंदोलनाचा इशारा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software