पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?

पुणे:

पुणे शहरातील ऐतिहासिक आणि उत्साही गणेश विसर्जन मिरवणूक यंदा एकूण ३३ तास २७ मिनिटांत अत्यंत शांततेत व उत्साहात पार पडली. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८:४३ वाजता मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीने सुरुवात झालेली ही विसर्जन प्रक्रिया २६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:१० वाजता पूर्ण झाली. पुणे पोलीस आयुक्तालयाकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती व आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

एकूण विसर्जन आकडेवारी

यंदाच्या गणेशोत्सवात पुणे शहरामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आले:  

सार्वजनिक गणपती: एकूण ४,१७० सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले. यामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी १०५, तर अकराव्या दिवशी २,९२७ मंडळांच्या श्रींचे विसर्जन पार पडले.  

घरगुती गणपती: शहरात एकूण ६,२४,६८५ घरगुती गणपतींना भाविकांनी निरोप दिला.  

मानाच्या ५ गणपतींच्या विसर्जनाचा तपशील

१. श्री कसबा गणपती (मानाचा पहिला): २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८:४३ वाजता मिरवणूक सुरू झाली. लक्ष्मी रस्ता मार्गे दुपारी ३:१५ वाजता अलका चौकात आगमन झाले व नटेश्वर घाटावर सायंकाळी ४:४३ वाजता विसर्जन पार पडले (एकूण कालावधी: ८ तास).

२. श्री तांबडी जोगेश्वरी (मानाचा दुसरा): सकाळी ९:१८ वाजता मिरवणूक सुरू होऊन नटेश्वर घाटावर सायंकाळी ५:०२ वाजता विसर्जन झाले (एकूण कालावधी: ७ तास ४४ मिनिटे).

३. श्री गुरुजी तालीम (मानाचा तिसरा): सकाळी ९:३९ वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला व नटेश्वर घाटावर सायंकाळी ५:०५ वाजता विसर्जन पार पडले (एकूण कालावधी: ७ तास २६ मिनिटे).

४. श्री तुळशीबाग (मानाचा चौथा): सकाळी ९:३० वाजता सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी ५:४० वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जित झाली (एकूण कालावधी: ८ तास १० मिनिटे).

५. श्री केसरी वाडा (मानाचा पाचवा): सकाळी ९:२६ वाजता प्रस्थान करून सायंकाळी ६:१२ वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन संपन्न झाले (एकूण कालावधी: ८ तास ४६ मिनिटे).  

महत्वाच्या गणपती मंडळांची वेळ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती: २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४:१८ वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली. लक्ष्मी रस्त्यावरून जात रात्री ८:२७ वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले (एकूण कालावधी: ४ तास ९ मिनिटे).  

हुतात्मा बाबू गेणू मंडळ: सायंकाळी ५:४३ वाजता सुरू झालेली मिरवणूक २६ सप्टेंबर रोजी पहाटे १:०५ वाजता नटेश्वर घाटावर संपली (एकूण कालावधी: ७ तास २२ मिनिटे).  

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती: २५ सप्टेंबर सायंकाळी ५:०० वाजता मिरवणूक सुरू होऊन २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८:४५ वाजता जागेवरच विसर्जन पार पडले (एकूण कालावधी: ११ तास ८ मिनिटे).  

अखिल मंडई मंडळ: २५ सप्टेंबर रोजी रात्री ७:०५ वाजता मिरवणूक सुरू होऊन २६ सप्टेंबर रोजी पहाटे ४:३४ वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले (एकूण कालावधी: ९ तास २९ मिनिटे).  

जिलब्या मारुती मंडळ: २५ सप्टेंबर सायंकाळी ६:०० वाजता सुरू झालेली मिरवणूक २६ सप्टेंबर रोजी पहाटे १:१० वाजता नटेश्वर घाटावर पूर्ण झाली (एकूण कालावधी: ७ तास १० मिनिटे).  

पोलिसांची धडक कामगिरी: ११ आरोपींना अटक

विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणे शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या कालावधीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रु. ३०,५७,०५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भारतीय न्याय संहिता व शस्त्र कायद्यान्वये आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.  

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?

Latest News

पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?  पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?
पुणे: पुणे शहरातील ऐतिहासिक आणि उत्साही गणेश विसर्जन मिरवणूक यंदा एकूण ३३ तास २७ मिनिटांत अत्यंत शांततेत व उत्साहात पार...
गणपती विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांकडून ११ जणांना अटक, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद; बनावट ओळखपत्र दाखवून उकळत होता हजारो रुपये
गणेशोत्सवात पुणे मेट्रोची विक्रमी भरारी; १२ दिवसांत ४८ लाखांहून अधिक प्रवासी, ७.४९ कोटींची कमाई
पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक; शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला घेरले, आंदोलनाचा इशारा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software