पुण्यात अवैध गुटख्यावर पोलिसांचा दणका; वडगाव शेरीत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील वडगाव शेरीत पोलिसांच्या 'मिशन क्रॅकडाऊन' अंतर्गत १.५९ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त. दोन आरोपींवर चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल.

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहिमे अंतर्गत बेकायदा आणि घातक तंबाखु जन्य पदार्थां विरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे. परिमंडल ७ अंतर्गत अवैध व्यवसायांवर वचक निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने वडगाव शेरी परिसरात छापा टाकून तब्बल १ लाख ५९ हजार रुपयांहून अधिक मूल्याचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

      पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, यलप्पा तिरकप्पा शेट्टी (वय ३५, रा. टेम्पो चौक, सचिन नगर, वडगाव शेरी) आणि चंद्रकांत फुलचंद पटवा (रा. विद्यानगर, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी चंदननगर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना, विशेष पथकाचे सहायक पोलीस फौजदार तिरुपती रामचंद्र लिंगण्णा यांना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, यलप्पा शेट्टी हा आपल्या परिसरात प्रतिबंधित गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी साठवून ठेवत आहे.

      या मिळालेल्या माहितीची खातर जमा केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून टेम्पो चौक परिसरातून यलप्पा शेट्टी यास ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने मोझेसवाडी येथील एका खोलीत गुटखा व पानमसाला लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, पांघरुणा खाली लपवून ठेवलेला तब्बल १ लाख ५९ हजार ८८० रुपये किमतीचा अवैध माल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान हा माल चंद्रकांत पटवा याच्याकडून घेतल्याचे समोर आल्याने पोलिसांनी दोघांविरुद्धही गुन्हे नोंदवले आहेत.

      सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, तसेच पोलीस हवालदार सुशिल बेंद्रे, विलास केदारी, गणेश इथापे आणि पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, शुभम चिनके, अमोल सरतापे, लालु कण्डे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या अशा अवैध साठवणूक व विक्री विरोधात पोलीस प्रशासनाकडून अशीच कठोर भूमिका पुढेही कायम राहणार आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; प्रश्नावली बदलण्याची खर्गे-राहुल गांधींची मागणी

Latest News

जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; प्रश्नावली बदलण्याची खर्गे-राहुल गांधींची मागणी जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; प्रश्नावली बदलण्याची खर्गे-राहुल गांधींची मागणी
केंद्र सरकारच्या जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप. खुल्या प्रश्नांऐवजी 'ड्रॉपडाउन' पर्याय ठेवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र.
लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी? २०२९ वर केंद्राचा विचार
पुण्यात अवैध गुटख्यावर पोलिसांचा दणका; वडगाव शेरीत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
श्रीराम साखर कारखाना बंद पाडण्याचा सरकारचा डाव; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
आदिवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहीम; ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन चाचणी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software