पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नैसर्गिक वायू पुरवठा होणार अधिक सक्षम; एमएनजीएलतर्फे ६५ किलोमीटर लांबीच्या नवीन पाइपलाइन प्रकल्पाची घोषणा

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अखंडित सीएनजी व पीएनजी पुरवठ्यासाठी MNGL कडून ६५ किमी लांबीच्या स्टील ट्रंक पाइपलाइन प्रकल्पाचे काम सुरू. जुलै २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याचे लक्ष्य.

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विकासाची गरज लक्षात घेता, नागरिकांना आणि वाहनचालकांना सुरळीत, सुरक्षित व अखंडित नैसर्गिक वायू पुरवठा करण्यासाठी ‘महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड’ने (MNGL) एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शहराचा गॅस पुरवठा अधिक सक्षम व विश्वासार्ह करण्यासाठी कंपनीकडून तब्बल ६५ किलोमीटर लांबीच्या स्टील ट्रंक पाइपलाइन (एसटीपीएल) प्रकल्पाची उभारणी सुरू करण्यात आली असून, यामुळे भविष्यातील वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे.

       सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला चिखली आणि तळेगावातील सिटी गेट स्टेशनमार्फत गॅस पुरवठा केला जातो, जो प्रामुख्याने गेलच्या (GAIL) दहेज-उरण-दाभोळ-पनवेल पाइप लाइन नेटवर्कवर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सीएनजी आणि पीएनजीची मागणी प्रचंड वाढल्याने पुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. परिणामी, अनेकदा सीएनजी पंपावर गॅसचा दाब (प्रेशर) कमी होण्याच्या समस्या निर्माण होत असून वाहन चालकांना लांबच लांब रांगांमध्ये तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. या समस्येवर दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी एमएनजीएलने भारतीय तेल महामंडळाच्या (इंडियन ऑइल) ईस्ट-वेस्ट पाइपलाइन नेटवर्कशी जोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या ६५ किलोमीटर लांबीच्या पाइप लाइनमुळे शहराला एक अतिरिक्त आणि पर्यायी गॅसस्रोत उपलब्ध होईल, ज्यामुळे वितरण जाळ्याची क्षमता कैक पटीने मजबूत होईल. आगामी जुलै २०२७ पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेण्यात आले आहे.

       या नव्या प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक परिसर, तळेगाव दाभाडे, हिंजवडी आयटी पार्क आणि राजगुरुनगर परिसरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या एमएनजीएलच्या माध्यमातून पुणे व परिसरात १३१ सीएनजी स्थानके कार्यरत असून, आठ लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांना पीएनजी पुरवठा केला जात आहे. तसेच सहा लाखांहून अधिक सीएनजी वाहने या यंत्रणेवर अवलंबून असून दररोज १४ लाख स्टँडर्ड क्युबिक मीटरहून अधिक गॅसचा वापर होतो. व्यावसायिक वाहनचालक, रिक्षाचालक आणि खासगी नोकरदारांना कमी दाबाच्या समस्येमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. नवीन पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर गॅस पुरवठ्यातील सर्व अडथळे दूर होऊन लाखो वाहनचालक व नागरिकांचा प्रवासातील व प्रतीक्षेतील बहुमूल्य वेळ वाचणार आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

साताऱ्यात धरणांवर सौरऊर्जेची निर्मिती; उमरोडी-कण्हेरवर तरंगते सौरप्रकल्प उभारणार

Latest News

साताऱ्यात धरणांवर सौरऊर्जेची निर्मिती; उमरोडी-कण्हेरवर तरंगते सौरप्रकल्प उभारणार साताऱ्यात धरणांवर सौरऊर्जेची निर्मिती; उमरोडी-कण्हेरवर तरंगते सौरप्रकल्प उभारणार
सातारा जिल्ह्यातील उमरोडी व कण्हेर धरणांच्या जलाशयांवर ८२ मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार. जमिनीविना होणार हरित ऊर्जेची निर्मिती....
पुण्यात बसमध्ये चढताना पाय घसरला; विद्यार्थिनीचा चाकाखाली मृत्यू
अमरावतीत रुग्णालयाला आग; व्हेंटिलेटरच्या स्फोटात ३ नवजात बालकांचा मृत्यू
गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम; शासन निर्णय जारी
दिल्लीत भीषण अपघात; स्विफ्ट-इनोव्हा धडकेत दोन आमदारांसह ६ जण जखमी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software