संतोष पंडितांना जामीन मिळताच धंगेकरांकडून सत्कार; पोलिसांच्या कारवाईवर जोरदार टीका

युट्युबर संतोष पंडित यांना जामीन मिळताच रवींद्र धंगेकरांकडून सत्कार. पुणे पोलिसांच्या कारवाईवर धंगेकरांची तीव्र टीका व सत्ताधाऱ्यांवर निशाणा.

पुणे: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आणि एका प्रकरणात जेलची हवा खाऊन नुकतेच जामिनावर बाहेर आलेले पुण्याचे वादग्रस्त युट्युबर संतोष पंडित पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या कार्यालयात बोलावून संतोष पंडित यांचा जाहीर सत्कार केला आहे. या सत्कारावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, धंगेकरांनी या कार्यक्रमादरम्यान पुणे पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संतोष पंडित यांना ज्या पद्धतीने रात्रीच्या वेळी अटक करण्यात आली, ती पद्धत एखाद्या गुंडाप्रमाणे होती, असा खळबळजनक आरोप करत धंगेकरांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.

        काही दिवसांपूर्वी युट्युबर संतोष पंडित यांना ३ सप्टेंबर रोजी कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. याशिवाय, एका महिलेने संतोष पंडित यांच्याविरोधात व्हिडिओ पाहून मनास लज्जा उत्पन्न झाल्याचे सांगत कोथरूड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी ॲक्टनुसार (IT Act) गंभीर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली होती. काही दिवस कोठडीत राहिल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालया कडून संतोष पंडित यांना जामीन मंजूर झाला. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपले सामाजिक कार्य जोमाने सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी संतोष पंडित यांना आपल्या कार्यालयात आमंत्रित करून त्यांचा सत्कार केल्याने राजकीय गोटात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

         सत्कारा नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट शब्दांत संतोष पंडित यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, “संतोष पंडित यांच्यावर विनाकारण गुन्हा दाखल करण्याची कोणतीही गरज नव्हती. त्यांना माझे पूर्ण समर्थन आहे. पुणे पोलीस नेमके कोणासाठी आणि कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? आज कलियुगाची सुरुवात जणू कोथरूड मधूनच झाली आहे असे वाटते. दादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहशतीचे वातावरण तयार केले जात आहे. मात्र, ही हिटलर शाही आणि हुकूमशाही फार काळ टिकणारी नाही. संतोष पंडित यांना ज्या पद्धतीने रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली, ती एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे होती. पुणे पोलिसांची या संपूर्ण प्रकरणातील भूमिका अजिबात पारदर्शक नाही.”

       संतोष पंडित यांच्या समर्थनार्थ रवींद्र धंगेकरांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. एका बाजूला महिला तक्रारदाराने विनयभंगाचा आणि गंभीर गुन्ह्याचा आरोप केला असताना, दुसऱ्या बाजूला लोक प्रतिनिधीं कडून अशा प्रकारे उघड समर्थन मिळणे कितपत योग्य आहे, यावरही तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आगामी काळात या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणखी वाद पेटण्याची चिन्हे दिसत असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरून सुरू असलेला हा राजकीय संघर्ष आगामी काळात काय वळण घेणार, याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Latest News

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे: पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाट परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या कामांतर्गत येत्या बुधवारी (२३ सप्टेंबर २०२६) दिवेघाटात ब्लास्टिंग...
माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा समान नागरी कायदा समितीच्या राजीनामा; कार्यपद्धतीवर आक्षेप
राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू; फडणवीसांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
व्हॉट्सॲपवर कंपनी मालक बनून १.१५ कोटींचा गंडा; पुणे सायबर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश, ५ जण जेरबंद
सिंहगड रोडवर गुन्हे शाखेचा दणका; गावठी पिस्तूल-काडतुसांसह सराईत जेरबंद, पुरवठादारही अटकेत

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software