सातारा शहरात गणेश विसर्जना निमित्त वाहतुकीत मोठा बदल; मुख्य मार्ग बंद, पोलिसांचे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

सातारा शहरात २४ व २५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल. मुख्य रस्ते बंद असून पर्यायी मार्ग आणि पार्किंगची सोय जाहीर.

सातारा : सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक विना अडथळा, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. विसर्जनाच्या दिवशी होणारी अभूतपूर्व गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३४ नुसार विशेष वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असून वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

          या कालावधीत राजवाडा ते शेटे चौक, कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक, मोती चौक, शनिवार चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर, तसेच बुधवार नाका आणि मोती तलावाकडे जाणारे मुख्य रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहेत. याशिवाय मोळाचा ओढा ते गुरुवार नाका आणि समर्थ मंदिर ते चांदणी चौक या मार्गांवरही वाहनांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जड वाहने आणि बस बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे वळवण्यात आल्या आहेत, तर गोडोली नाका, मोळाचा ओढा आणि शाहूपुरी परिसरातील वाहतूक संगमज फाटा, आझाद मैदान, सदर बाजार आणि खिंडवाडी मार्गे प्रवासासाठी मोकळी ठेवण्यात आली आहे.

         विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर (राजवाडा ते विसर्जन तळे) दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी 'नो-पार्किंग झोन' घोषित करण्यात आला असून, रस्त्यावर वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विसर्जन पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तालीम संघाजवळील मैदान आणि कोटेश्वर मैदान येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि पोलीस वाहनांसारख्या अत्यावश्यक सेवांना या बंदीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. सण-उत्सव उत्साहात आणि सुरक्षितपणे साजरे करण्यासाठी नागरिक व वाहनधारकांनी या वाहतूक बदलांची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासना कडून करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Latest News

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे: पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाट परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या कामांतर्गत येत्या बुधवारी (२३ सप्टेंबर २०२६) दिवेघाटात ब्लास्टिंग...
माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा समान नागरी कायदा समितीच्या राजीनामा; कार्यपद्धतीवर आक्षेप
राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू; फडणवीसांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
व्हॉट्सॲपवर कंपनी मालक बनून १.१५ कोटींचा गंडा; पुणे सायबर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश, ५ जण जेरबंद
सिंहगड रोडवर गुन्हे शाखेचा दणका; गावठी पिस्तूल-काडतुसांसह सराईत जेरबंद, पुरवठादारही अटकेत

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software