सिंहगड रोडवर गुन्हे शाखेचा दणका; गावठी पिस्तूल-काडतुसांसह सराईत जेरबंद, पुरवठादारही अटकेत

पुणे गुन्हे शाखेची सिंहगड रोड परिसरात मोठी कारवाई. गावठी पिस्तूल व काडतुसांसह रोहन राठोड व मुख्य पुरवठादार ओंकार मोरे अटकेत.

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने शहरात वाढत्या अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारीवर मोठा वचक बसवत एक धडक कारवाई केली आहे. सिंहगड रोड, नवले पूल आणि नांदेड सिटी परिसरा मध्ये गस्त घालत असताना पोलिसांनी एका तरुणाला बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी असा ऐवज जप्त केला असून, कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य पिस्तूल पुरवठादारालाही अवघ्या काही तासांत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

       प्राप्त माहिती नुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे अधिकारी व अंमलदार सिंहगड रोड, नवले पूल आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रांच्या अनुषंगाने नियमित गस्त घालत होते. या दरम्यान नांदेड गावाजवळ गस्त सुरू असताना पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे आणि तुषार किंदे यांना एका खबऱ्यामार्फत अत्यंत महत्त्वाची गुप्त बातमी मिळाली. या मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदेड गावातील स्मशान भूमीच्या पार्किंगजवळ तत्काळ सापळा रचला. सापळा यशस्वी करत पोलिसांनी रोहन सुरेश राठोड (वय २१, रा. अभिर्राज काळुंदी अपार्टमेंट, नांदेड गाव, पुणे) याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्याची पंचांसमोर अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक बेकायदेशीर पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी आढळून आली, जी पोलिसांनी तात्काळ जप्त केली.

         पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रोहन राठोड याच्याकडे पिस्तुलाच्या स्रोता बाबत सखोल चौकशी केली असता, त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली. हे अवैध पिस्तूल त्याने ओंकार सचिन मोरे (वय २३, रा. मराठा महासंघ सोसायटी, मुठेश्वर चौक, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली त्याने दिली. या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेल्या ओंकार मोरे यालाही या प्रकरणात बेड्या ठोकल्या. ओंकार मोरे याच्यावर यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, दोन्ही आरोपींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून त्यांना पुढील तपास व पुढील कारवाईसाठी नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

         ही यशस्वी धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर, सहाय्यक पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे तसेच पोलीस अंमलदार अतुल साठे, पुरुषोत्तम गुंडला, योगेश झेंडे, तुषार किंदे आणि विपुल गायकवाड यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आगामी काळातील संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Latest News

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे: पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाट परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या कामांतर्गत येत्या बुधवारी (२३ सप्टेंबर २०२६) दिवेघाटात ब्लास्टिंग...
माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा समान नागरी कायदा समितीच्या राजीनामा; कार्यपद्धतीवर आक्षेप
राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू; फडणवीसांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
व्हॉट्सॲपवर कंपनी मालक बनून १.१५ कोटींचा गंडा; पुणे सायबर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश, ५ जण जेरबंद
सिंहगड रोडवर गुन्हे शाखेचा दणका; गावठी पिस्तूल-काडतुसांसह सराईत जेरबंद, पुरवठादारही अटकेत

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software