यवतमाळच्या दुष्काळी भागात बावनकुळे; ‘शेतकऱ्यांच्या मदतीत कोणतीही कमतरता पडू देणार नाही’

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळच्या नरसापूरमध्ये दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना पूर्ण मदतीचे आश्वासन दिले.

यवतमाळ: महाराष्ट्रात तीव्र होत चाललेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून युद्धपातळीवर उपाय योजना हाती घेण्यात आल्या असून, याच अनुषंगाने महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नरसापूर येथे प्रत्यक्ष दौरा करत दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी सविस्तर संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी, तसेच वीज व पाण्याच्या उपलब्धते बाबत सविस्तर विचारपूस केली. संकटकाळात शासन पूर्णपणे बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत आणि दिलासा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

              राज्य शासनाने राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, प्रशासकीय यंत्रणा अत्यंत गतीने आणि संवेदनशीलता बाळगून काम करत असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, पाणीबचतीची कामे तातडीने हाती घ्यावीत आणि पीक पाहणी तसेच नुकसानीचे पंचनामाने कोणत्याही विलंबविना युद्धपातळीवर पूर्ण केले जावेत, जेणेकरून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळू शकेल. या महत्त्वाच्या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, खासदार संजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ॲड. प्रफुल्ल चव्हाण, नितीन भुतडा, प्रिया तोडसाम, आरती फुफाटे, देवानंद पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अभय देशपांडे, गटविकास अधिकारी अजय चव्हाण आणि तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

          या संपूर्ण पाहणी दौऱ्या दरम्यान एका महत्त्वपूर्ण तांत्रिक समस्येवर मंत्र्यांनी जागेवरच (On the spot) त्वरित कारवाई करत दाखवलेली तत्परता लक्षवेधी ठरली. शेतकऱ्यांनी डीसीएस (DCS) ॲपवर आपल्या पीक पेऱ्याची नोंदणी केल्यानंतर ती संबंधित सॉफ्टवेअर किंवा संकेत स्थळावर प्रदर्शित होत नसल्याची गंभीर अडचण महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या तांत्रिक त्रुटीची तात्काळ दखल घेत मंत्री बावनकुळे यांनी कोणताही विलंब न लावता अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त यांच्याशी थेट 'कॉन्फरन्स कॉल' जोडला. अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत ही तांत्रिक अडचण तातडीने दूर करण्याचे आणि सर्व्हर मधील त्रुटी सुधारण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले, ज्यामुळे प्रशासकीय पातळीवरील ढिसाळपणा तात्काळ संपुष्टात आला. दुष्काळाच्या या भीषण संकटात केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष जमिनीत उतरून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जागेवरच सोडवण्याच्या या कार्यपद्धतीमुळे बळीराज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी

Latest News

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी
इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने स्टारशिपच्या १४व्या चाचणीत इतिहास रचत यान पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले व २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वीरीत्या सोडले....
महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्राचे लक्ष; शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या दौऱ्यावर येणार
दिवाळीच्या रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांची धावपळ; बुकिंग सुरू होताच तिकिटे फुल्ल,वेटिंग’चा मनस्ताप
एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना शरद पवारांचा स्पष्ट नकार; यायचं असेल तर आमच्यासोबत या
हुंड्याच्या छळाचा आरोप अन् वैष्णवीचा दुर्दैवी अंत; नवविवाहित आयटी अभियंतेच्या मृत्यूने पुण्यात खळबळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software