चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; सातारा पोलिसांनी १२ दिवसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या

सातारा जिल्ह्यातील राजाचे कुर्ले येथील अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडा; चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी माळशिरसमधून बेड्या ठोकल्या.

सातारा : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या एका अंधाऱ्या खुनाचा पर्दाफाश करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि औंध पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. चारित्र्याच्या संशयावरून स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह फेकून देणाऱ्या पतीला पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास आणि अहोरात्र केलेल्या अथक परिश्रमांमुळे अखेर जेरबंद केले आहे. मृत महिलेची कोणतीही प्राथमिक ओळख किंवा पुरावा नसताना पोलिसांनी तब्बल १२ दिवस शेकडो सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी करत, तसेच तीन-चार जिल्ह्यांत तांत्रिक व गुप्त तपासाचा पांगारत हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

           या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, गत १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअथा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले गावच्या हद्दीत, झीरो पॉईंट परिसरातील संग्राम संभाजी माने यांच्या शेतालगत एका अज्ञात महिलेचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील जानकर यांना तात्काळ ओळख पटवून आरोपीला शोधून काढण्याचे सक्त निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदारांची विशेष स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.

        घटनेच्या ठिकाणी मृत महिलेची कोणतीही ओळख पटू शकेल असा पुरावा किंवा कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे पोलिसा समोर सुरुवातीला मोठे आव्हान उभे ठाकले होते. मात्र, तपास पथकांनी हार न मानता घटना स्थळा पासून ते संभाव्य सर्व मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज कसून तपासण्यास सुरुवात केली. एका सीसीटीव्ही मधील हालचालींचा धागा पकडत दुसऱ्या फुटेजशी साखळी जोडत पोलिसांनी महिलेच्या हालचालींचा सखोल मागोवा घेतला. सलग १२ दिवस सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागांतही तपास पथकांनी धडक देत गुप्त माहितीच्या आधारे कसून शोध घेतला. अखेरीस तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयित वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. त्या वाहन क्रमांकावरून मालकाचा शोध घेतल्यानंतर पोलीस सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे पोहोचले.

            तेथे राहुल संभाजी कोळी (वय ४० वर्षे, रा. मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने पोलिसा समोर उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत व आपल्या 'इन्टोरोगेशन स्किल'चा (Interrogation Skill) वापर करत सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपल्या पत्नीला म्हणजेच मनीषा राहुल कोळी (वय ४० वर्षे) हिला राजाचे कुर्ले परिसरात आणून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. मृत महिलेची ओळख पटवणे, तब्बल १२ दिवस शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासणे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांत व राज्याच्या सीमांपर्यंत शोध मोहीम राबवणे, अशा अटीतटीच्या आव्हानांवर मात करत सातारा पोलिसांनी हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे.

        सदर धडाकेबाज कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि औंध पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी सर्व तपास पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी

Latest News

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी
इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने स्टारशिपच्या १४व्या चाचणीत इतिहास रचत यान पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले व २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वीरीत्या सोडले....
महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्राचे लक्ष; शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या दौऱ्यावर येणार
दिवाळीच्या रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांची धावपळ; बुकिंग सुरू होताच तिकिटे फुल्ल,वेटिंग’चा मनस्ताप
एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना शरद पवारांचा स्पष्ट नकार; यायचं असेल तर आमच्यासोबत या
हुंड्याच्या छळाचा आरोप अन् वैष्णवीचा दुर्दैवी अंत; नवविवाहित आयटी अभियंतेच्या मृत्यूने पुण्यात खळबळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software